अभीं तो मैं जवान हूँ ! अनिल कपूरचा शर्टलेस फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'झक्कास'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 06:00 AM2020-10-22T06:00:00+5:302020-10-22T06:00:00+5:30

आपल्या झक्कास अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले अभिनेता म्हणजे अनिल कपूर. आजवर विविध चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अनिल कपूर यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.

आजही अनिल कपूर चित्रपटसृष्टीत त्याच उत्साहाने आणि त्याच ताकदीने काम करत आहेत.

अनिल कपूर यांचा उत्साह आजच्या तरुण कलाकारांना लाजवेल असाच आहे.

आजही अनिल कपूर चिरतरुण असल्याप्रमाणे भासतात.

वयाची ६० ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी दिसून येते.

सध्या सोशल मीडियावर अनिल कपूरचा शर्टलेस फोटो व्हायरल झाला आहे.

हा फोटो पाहून भल्या भल्यांनाही आश्चर्य वाटेल अशी त्यांची शरिरयष्टी आहे.

त्यांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाचा लवलेशही दिसत नाही.

८० आणि ९० च्या दशकात त्यावेळी अनिल कपूर जसे दिसायचे तसेच ते आजही पाहायला मिळत आहेत.

याबरोबरच त्याच्या खाण्यापिण्याकडेही विशेष लक्ष देतो. योग्य आहार घेत आजही अनिल कपूर यंगच आहेत.

अनिल कपूर आजही फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग असल्याचे या फोटोंमुळे स्पष्ट होते.