अभिनेत्री राशी मलची 'द मिसिंग स्टोन' सीरिज आली प्रेक्षकांच्या भेटीला, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:00 AM2021-01-12T06:00:00+5:302021-01-12T06:00:00+5:30

राशी मलने 'द मिसिंग स्टोन' वेबसीरिजमध्ये पायलची भूमिका साकारली आहे.

राशी मल अभिनीत ‘द मिसिंग स्टोन’ नुकतीच एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली. राशी यात ‘पायल’ नामक व्यक्तिरेखा साकारते आहे, जिच्यामुळे एक रहस्यमय घटनांची मालिकाच सुरू होते आणि तोच या वेधक थ्रिलरचा मुख्य आधार आहे.

याबद्दल राशी म्हणते, या मालिकेत पायल या व्यक्तिरेखेचा जो प्रवास आहे त्यानेच मला ही पटकथा निवडण्यास उद्युक्त केले.

या मालिकेत तीन मुख्य व्यक्तिरेखांचा प्रवास आहे आणि प्रत्येक पावलागणिक गूढ रहस्ये उलगडत जातात.

भारतात सायकॉलॉजिकल थ्रिलर हा प्रकार हळूहळू लोकप्रिय होऊ लागला आहे आणि ‘द मिसिंग स्टोन’ प्रेक्षकांना नक्कीच त्यांच्या जागेवर खिळवून ठेवेल, अशी आशा राशी मलला आहे.

राशी पुढे म्हणते, “कडक लॉकडाउन असताना याचे शूटिंग झाले, पण शूटिंगचा अनुभव खूप छान होता.

राशी नमूद करते की, बरून सोबती आणि बिदिता बाग या सह-कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप मस्त होता. सेटवर तिला मोकळेपणा जाणवून दिल्याबद्दल ती सोबती आणि बाग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.

राशी मलने हेलिकॉप्टर ईला चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. य़ाशिवाय सर चित्रपटातही ती झळकली आहे.