अध्यात्मिक गुरुनेच केले होते गैरवर्तन, 'आश्रम 2' मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 06:00 AM2020-11-13T06:00:00+5:302020-11-13T06:00:00+5:30

दिवसागणिक कोणत्या ना कोणत्या खासगी जीवनाशी निगडीत गौप्यस्फोट सध्या अभिनेत्री करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अनुपिया गोयनकानेही एक गौप्यस्फोट केला आहे.

'आश्रम' आणि 'आश्रम 2' या वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री अनुपिया गोयनकाने आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे.

एका अध्यात्मिक गुरुनेच गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले आहे. देवाचे आभार मानते, मी वेळीच सावध झाले.

मी त्याच्यापासून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यावेळी ती फक्त १८ वर्षाची होती.

त्याने माझे शोषण करण्याचा प्रयत्न केला यावर माझा प्रथम विश्वास बसत नव्हता. मला हे स्वीकारण्यास खूप वेळ लागला'', असे ती म्हणाली.

'आश्रम' वेबसिरीजमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचेही विशेष कौतुक होत आहे.

आश्रम व्यतिरिक्त, अनुप्रियाने 'पद्मावत', 'टायगर जिंदा है' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

'क्रिमिनल जस्टिस' या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आणि तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते.

तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते.

तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. काही दिवसांपूर्वी रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती.