बॉक्स ऑफिसवर १०० करोडहून अधिकच कमवतात या बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 05:25 PM2019-03-30T17:25:28+5:302019-03-30T17:43:43+5:30

रणबीर कपूरच्या ये जवानी है दिवानी, बर्फी, ए दिल है मुश्कील, संजू या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे.

वरुण धवनला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून काहीच वर्षं झाली असली तरी बद्रिनाथ की दुल्हनिया, जुडवा २ आणि एबीसीडी २ यांचा १०० करोडच्या क्लबमध्ये समावेश आहे.

अभिषेक बच्चनच्या धूम ३, बोल बच्चन, हॅपी न्यू इयर आणि हाऊसफुल या चित्रपटांनी १०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

हृतिक रोशनच्या अग्निपथ, क्रिश ३, बँग बँग आणि काबिल चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० हून अधिक कोटी कमावले आहेत.

अक्षय कुमारने गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या केसरी या चित्रपटाने नुकताच १०० कोटींचा गल्ला जमा केला. त्याचप्रमाणे टॉयलेट एक प्रेमकथा, एअरलिफ्ट, रावडी राठोड, रुस्तम, जॉनी एलएलबी २, हाऊसफुल २ यांसारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली आहे.

रणवीर सिंहने गुंडे, बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिम्बा आणि गली बॉय असे हिट चित्रपट दिले असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

सलमान खानचा चित्रपट म्हटला की तो १०० कोटीहून अधिक कमाई करणारच असे म्हटले जाते. टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, सुलतान, किक, प्रेम रतन धन पायो, दबंग २, एक था टायगर, बॉडीगार्ड, रेस ३, ट्युबलाईट, रेडी, जय हो यांसारख्या सलमानच्या १३ चित्रपटांनी १०० कोटीहून अधिक कलेक्शन केले आहे. त्यामुळे सलमानला बॉक्स ऑफिसचा किंग मानले जाते.

अजय देवगणच्या गोलमाल अगेन, सिंघम, सिंघम रिटर्न्स, टोटल धमाल, गोलमाल ३, रेड, सन ऑफ सरदार, शिवाय या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटीहून अधिक कलेक्शन केले आहे.

किंग खान शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेस, रईस, दिलवाले, हॅपी न्यू ईयर, रावन, डॉन २, जब तक है जान या चित्रपटांचा १०० करोडच्या क्लबमध्ये प्रवेश झाला आहे.

आमिर खानला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हटले जाते. त्याच्या गजिनी, ३ इडियट्स, पीके, धूम ३, ठग्स ऑफ हिंदुस्थान आणि पीके या चित्रपटांनी १०० करोडचा आकडा पार पाडला आहे.