BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:21 IST2026-01-16T14:20:46+5:302026-01-16T14:21:40+5:30

राष्ट्रवादीचे जनमत घसरले; भाजप १२ जागांवर आडले

Parbhani Municipal Election 2026 BJP suffers setback in Parbhani ; Uddhav Sena-Congress alliance on the verge of majority | BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा

BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा

परभणी: शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली आहे. एकूण ६५ जागांच्या सभागृहात उद्धव सेनेने सर्वाधिक २५ जागा पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर काँग्रेसने १२ जागा जिंकत आघाडी मजबूत केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला असून पक्षाला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजप १२ जागांवर आडला आहे.

प्रभागनिहाय निकाल पाहता अनेक प्रभागांत उद्धव सेनेचा दबदबा स्पष्ट दिसून आला. प्रभाग क्रमांक २, ३, ८ आणि १२ मध्ये उद्धव सेनेने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. काँग्रेसने प्रभाग ११ मध्ये चारही जागांवर विजय मिळवला, तर प्रभाग ७ मध्ये काँग्रेसला तीन आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. भाजपला प्रभाग ५ मध्ये चार जागा मिळाल्या असून प्रभाग १५ मध्ये तीन जागांवर यश मिळाले. 

राष्ट्रवादीला प्रभाग ६ मध्ये चार जागा मिळाल्या असल्या तरी इतर ठिकाणी पक्षाची पिछाडी ठळकपणे दिसून आली. प्रभाग १३ मध्ये जन सुराज्य पक्षाने तीन जागा जिंकत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यशवंत सेनेला एक जागा मिळाली आहे.या निकालामुळे परभणी महापालिकेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले असून उद्धव सेना–काँग्रेस आघाडीचे नेतृत्वाखाली स्थिर सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

अंतिम पक्षनिहाय निकाल :

उद्धवसेना : २५
काँग्रेस : १२
भाजप : १२
राष्ट्रवादी काँग्रेस : ११
जन सुराज्य पक्ष : ३
यशवंत सेना : १
अपक्ष : १    

Web Title : परभणी में भाजपा को झटका; शिवसेना-कांग्रेस गठबंधन आगे।

Web Summary : परभणी महानगरपालिका चुनाव परिणाम दर्शाते हैं कि शिवसेना (उद्धव) आगे है। कांग्रेस के समर्थन से सत्ता सुरक्षित हो सकती है, संभावित रूप से भाजपा बाहर हो सकती है। 2026 के नागरिक मुद्दों और राजनीतिक बदलावों ने इस चुनाव को महत्वपूर्ण बना दिया।

Web Title : Setback for BJP in Parbhani; Shiv Sena-Congress alliance leads.

Web Summary : Parbhani Municipal Corporation election results show Shiv Sena (Uddhav) leading. Congress support could secure power, potentially ousting BJP. 2026's civic issues and political shifts made this election crucial.