भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:00 AM2024-04-16T06:00:34+5:302024-04-16T06:01:09+5:30

माजी मुख्यमंत्र्यांमुळे हायप्रोफाईल सीट, मात्र काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण 

Will the stronghold of BJP fall this year | भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार? 

भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार? 

गजानन चोपडे, लोकमत न्यूज नेटवर्क, राजनांदगाव : पाटण विधानसभा  मतदारसंघातून पाच वेळा निवडून येणाऱ्या छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेसने यंदा लोकसभेच्या आखाड्यात उतरविले आहे. गेल्या सात लोसभा निवडणुकीत एक अपवाद वगळता सहा वेळा भाजपनेच येथे बाजी मारली आहे. २००० साली राज्याची स्थापना झाल्यापासून भाजपने ही जागा पोटनिवडणुकीत एकदाच गमावली आहे. त्यामुळे काँग्रेसने यंदा बघेल यांच्यावर डाव लावला आहे. या मतदारसंघातील ८ विधानसभा क्षेत्रांपैकी काँग्रेसच्या ताब्यात ५ जागा असून तीन जागांवर भाजपचा कब्जा आहे. असे असले तरी भाजपला या जागांवर सात लाख पाच हजार ३७५ मते मिळाली होती तर काँग्रेसला पाच जागांवर सहा लाख ७४ हजार ७७६ मतांवर समाधान मानावे लागले होते.

राज्याच्या  स्थापनेनंतर लोकसभा निवडणूक लढणारे भूपेश बघेल हे दुसरे माजी मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी अजित जोगी यांनी हासमुंदमधून निवडणूक लढविली होती. माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बघेल राजनांदगावमधून निवडणूक लढवीत असल्यानेही ही सीट हाईप्रोफाईल झाली आहे. भाजपने दुसऱ्यांदा संतोष पांडे यांना उमेवारी दिली असून त्यांचा दांडगा जनसंपर्क भाजपसाठी जमेची बाजू ठरत आहे. २०१९ मध्येही संतोष पांडे यांनी ही जागा जिंकली होती, हे विशेष. तर अंतर्गत गटबाजीचे ग्रहण काँग्रेसचा पिच्छा सोडत नाही आहे. भूपेश बघेल यांच्या नावाला स्थानिक काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येते. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • भूपेश बघेल हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून २०१४ ते २०१९ पर्यंत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजनांदगावमधून उमेदवारी दिली.
  • तर मुख्यमंत्री असताना बघेल यांनी राजनांदगाव हा भाजपचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग याचा बालेकिल्ला असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप होत आहे.
  • गटबाजीमुळे काँग्रेस उमेदवाराला अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या नावाला कार्यकर्त्यांचाच विरोध असून त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो.

एकूण मतदार    १८,६२,०२१ 
पुरुष - ९,२७,१८४
महिला - ९,३४,८२६
 
१९९६ ते २१०९ पर्यंत या मतदारसंघातून भाजपला सहावेळा यश मिळाले आहे. १९९८ साली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांनी भाजपच्या प्रदीप गांधी यांचा पराभव केला होता. मात्र १९९९ मध्ये भाजपच्या डॅा. रमन सिंग यांनी ही जागा बळकावली. त्यानंतर रमन सिंग यांचे पक्षात वजन वाढले. 
  
२०१९ मध्ये काय घडले? 
संतोष पांडे भाजप (विजयी) ६,६२,३८७ 
भोलाराम साहू काँग्रेस (पराभूत) ५,५०,४२१ 

२०१९ पूर्वी कोणाची बाजी?
वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     

२०१४    अभिषेक पटेल     भाजप         ६,४३,४७३
२००९    मधुसूदन यादव    भाजप        ४,३७,७२१
२००४    प्रदीप गांधी    भाजप        ३,१४,५२०
१९९९    रमन सिंग    भाजप        ३,०४,६११
१९९८    मोतीलाल वोरा    काँग्रेस        ३,०४,७०९

Web Title: Will the stronghold of BJP fall this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.