Kolkata Shootout: मोठी बातमी! कोलकात्यात बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोळीबार; महिलेचा मृत्यू तर पोलिसाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:18 IST2022-06-10T15:26:58+5:302022-06-10T16:18:21+5:30

सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

West Bengal : Kolkata : A woman and a police officer shot dead outside the Bangladesh High Commission in Kolkata | Kolkata Shootout: मोठी बातमी! कोलकात्यात बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोळीबार; महिलेचा मृत्यू तर पोलिसाची आत्महत्या

Kolkata Shootout: मोठी बातमी! कोलकात्यात बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोळीबार; महिलेचा मृत्यू तर पोलिसाची आत्महत्या

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. कोलकात्यातील बांग्लादेश उच्चायुक्तालयाबाहेर हा गोळीबार झाला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचाऱ्याने झाडलेल्या गोळीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवरही गोळी झाडली, त्यात तोही ठार झालाय. ज्या महिलेचा मृत्यू झाला, ती दुचाकीवरुन जात होती. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेवर गोळीबार करणारा पोलीस कर्मचारी एका तासापासून त्या परिसरात फिरत होता.

सविस्तर वृत्त लवकरच...

Web Title: West Bengal : Kolkata : A woman and a police officer shot dead outside the Bangladesh High Commission in Kolkata