येथे सासरा अन् दोन सुना यांच्यात रंगणार लढत, हे आहेत निवडणुकीतील कळीचे मुद्दे

By राकेशजोशी | Published: May 23, 2024 02:40 PM2024-05-23T14:40:28+5:302024-05-23T14:41:52+5:30

५७ वर्षांच्या इतिहासात या लोकसभा मतदारसंघातून दोन महिला कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

There will be a fight between father-in-law and two daughters-in-law  | येथे सासरा अन् दोन सुना यांच्यात रंगणार लढत, हे आहेत निवडणुकीतील कळीचे मुद्दे

येथे सासरा अन् दोन सुना यांच्यात रंगणार लढत, हे आहेत निवडणुकीतील कळीचे मुद्दे

राकेश जोशी -

हिसार : हिसार लोकसभा मतदारसंघातील राजकीय मूडही यावेळी शिगेला पोहोचला आहे. भाजपचेे उमेदवार रणजितसिंह चौटाला यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबातील नैना चौटाला आणि सुनैना चौटाला या दोन सुना वेगवेगळ्या राजकीय पक्षांतून लढत आहेत. काँग्रेसने हिस्सारमधून माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश जेपी यांना  संधी देत ही लढत रंजक बनवली आहे. जनता दलाच्या तिकिटावर जेपी यांनी १९८९ मध्ये हिस्सारमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने हिस्सार लोकसभा मतदारसंघातून महिलेला तिकीट दिलेले नाही. ५७ वर्षांच्या इतिहासात या लोकसभा मतदारसंघातून दोन महिला कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून अद्यापही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनाही पुरेसा न्याय मिळाला नसल्याची ओरड आहे.
हिस्सारमधील चारही उमेदवार जाट आहेत. बहुतांश जागांवर जाट आणि बिगर जाट अशा जातीय समीकरणाच्या आधारे निवडणुका लढल्या गेल्याचा इतिहास आहे. या उमेदवारांसमोर समाजाची मते आकर्षित करण्याचे आव्हान असेलच, शिवाय बिगर जाट मतांना आकर्षित करण्याचे दडपणही असेल.

२०१९ मध्ये काय घडले?
बृजेंद्र सिंह, भाजप (विजयी) - ६,०३,२८९
दुष्यंत चौटाला, जजपा (पराभूत) - २,८९,२२१

Web Title: There will be a fight between father-in-law and two daughters-in-law 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.