तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:02 IST2025-06-30T11:55:20+5:302025-06-30T12:02:12+5:30

Telangana Blast: या घटनेतील जखमींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढू शकतो.

Telangana Blast: Massive explosion of tanker loaded with chemicals in Telangana, at least 10 people killed | तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Telangana Blast:तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत किमान १० जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाटण चेरू मंडळातील सिगाची केमिकल्स इंडस्ट्रीमध्ये हा स्फोट झाला. रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली, त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केले. हा संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आला. आग आटोक्यात आणण्यासाठी २ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कामगार कारखान्यात काम करत होते
कामगार कारखान्यात काम करत असताना हा स्फोट झाला. मोठा स्फोट ऐकून कर्मचारी घाबरुन बाहेर पळाले. स्फोटानंतर अनेक कामगार त्यात अडकले, त्यापैकी किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा वाढू शकतो. 

दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

Web Title: Telangana Blast: Massive explosion of tanker loaded with chemicals in Telangana, at least 10 people killed