सूरतमध्ये काॅंग्रेस निवडणूक स्पर्धेतून बाद; मूळ आणि पर्यायी दाेन्ही उमेदवारांचे अर्ज रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 08:54 AM2024-04-22T08:54:10+5:302024-04-22T08:54:48+5:30

अनुमाेदकांच्या स्वाक्षरीचा मुद्दा, अनुमाेदकांनी स्वाक्षऱ्या आपल्या उपस्थितीत केल्याचा दावा कुंभणी यांनी केला हाेता. त्यांनी हस्ताक्षर तज्ज्ञाद्वारे त्या तपासण्याची मागणी केली हाेती.

Surat Lok Sabha Constituency - Applications of both Congress candidates canceled, BJP will benefit | सूरतमध्ये काॅंग्रेस निवडणूक स्पर्धेतून बाद; मूळ आणि पर्यायी दाेन्ही उमेदवारांचे अर्ज रद्द

सूरतमध्ये काॅंग्रेस निवडणूक स्पर्धेतून बाद; मूळ आणि पर्यायी दाेन्ही उमेदवारांचे अर्ज रद्द

सूरत : उमेदवारी अर्जावर आपण स्वाक्षरी केलेल्या नसल्याचे अनुमाेदकांनी सांगितल्यानंतर गुजरातमध्ये सुरत मतदारसंघातील काॅंग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. याशिवाय याच मुद्द्यावरुन काॅंग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज रद्द करण्यात आला. सूरतमधून प्रमुख विराेधी पक्ष निवडणुकीच्या रणांगणातून आता बाहेर पडला आहे.

निवडणूक अधिकारी साैरभ पारधी यांनी कुंभणी आणि पडसाला यांना रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदत दिली हाेती. सुनावणीदरम्यान, अनुमाेदकांच्या स्वाक्षरीमध्ये प्राथमिकदृष्ट्या विसंगती आढळल्या. स्वाक्षऱ्या खऱ्या दिसत नाहीत, असे पारधी म्हणाले.  
भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचे प्रतिनिधी दिनेश जाेधानी यांनी उमेदवारी अर्जावर आक्षेप नाेंदविला हाेता. अनुमाेदकांनी स्वाक्षऱ्या आपल्या उपस्थितीत केल्याचा दावा कुंभणी यांनी केला हाेता. त्यांनी हस्ताक्षर तज्ज्ञाद्वारे त्या तपासण्याची मागणी केली हाेती. मात्र, याप्रकरणी सादर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये वादातीत हस्ताक्षर करणाऱ्या अनुमाेदकांची उपस्थितीच दिसत नसल्याचे आढळले. 

अर्ज रद्द करण्याचा निर्णय चुकीचा : काॅंग्रेस
याप्रकरणी काॅंग्रेसने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गाेहील यांनी सांगितले की, स्वाक्षरीच्या मुद्द्यावरुन अर्ज रद्द करता येत नाही. २०२२मध्ये विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराबाबतही असेच घडले हाेते. मात्र, त्यावेळी अर्ज रद्द करण्यात आला नव्हता.

Web Title: Surat Lok Sabha Constituency - Applications of both Congress candidates canceled, BJP will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.