जबलपूरमध्ये पीएम मोदींच्या रोड 'शो'मध्ये स्टेज कोसळलं, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 00:08 IST2024-04-08T00:01:22+5:302024-04-08T00:08:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड 'शो'दरम्यानह अपघात झाला. यात काहीजण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

जबलपूरमध्ये पीएम मोदींच्या रोड 'शो'मध्ये स्टेज कोसळलं, अनेकजण जखमी
देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रोड शो' झाला. या रोड शो'चे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पीएम मोदींचा हा रोड 'शो संपल्यानंतर एक अपघात झाला. रोड शो दरम्यान गोरखपूर परिसरात स्टेज कोसळलं.या अपघातात ६ हून अधिक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त लोक जमल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्टेज खाली पडला. पीएम मोदींचा हा रोड शो गोरखपूरच्या कटंगा चौकातून सुरू झाला आणि नॅरोगेजपर्यंत एक किलोमीटरहून अधिक चालला. रोड शोच्या मार्गावर मोठ्या संख्येने लोक जमले होते. अनेक ठिकाणी लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत होते. अनेक लोक हातात पीएम मोदींचे फोटो घेऊन पोहोचले.
'ते रामनवमीला दंगली घडवतील, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप
या रोड शो दरम्यान तेथे जमलेल्या जनसमुदायाच्या हातात भारतीय जनता पक्षाचा झेंडा दिसत होता. या रोड शोमध्ये पीएम मोदींसोबत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवही उपस्थित होते. या रोड शो'मध्ये पीएम मोदींसोबत भाजपचे उमेदवार आशिष दुबेही होते. यावेळी जमाव पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करत होता.
मध्य प्रदेशात भाजपने लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. भाजपने घरोघरी जाऊन पंतप्रधान मोदींच्या रोड शो'साठी लोकांना आमंत्रित केले होते. रोड शोच्या सुरक्षेसाठी तीन हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. रोड शो'वेळी समर्थकांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या.
या रोड शो'मध्ये ५० हजार लोक सहभागी झाल्याचा दावा भाजपने केला आहे. जबलपूरमधील या रोड शोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे मानले जात आहे. राज्यात लोकसभेच्या २९ जागा असून चार टप्प्यात मतदान होणार आहे. जबलपूरमध्ये काँग्रेसने दिनेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राकेश सिंह यांनी ही जागा जिंकली होती.
VIDEO | Lok Sabha elections 2024: Visuals of PM Modi's roadshow from Madhya Pradesh's Jabalpur.#LSPolls2024WithPTI#LokSabhaElections2024
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/VFr5RvTdrr— Press Trust of India (@PTI_News) April 7, 2024