‘...म्हणून त्यांनी घराणेशाहीबद्दल बोलण्याचे टाळले’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 08:20 AM2024-04-05T08:20:31+5:302024-04-05T08:21:30+5:30

Rashtriya Janata Dal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मी टीका केल्यानंतर त्यांनी बिहारमधील जमुई येथील सभेत घराणेशाहीच्या विरोधात एकही शब्द काढला नाही असा दावा त्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला.

'...so they avoided talking about dynasticism' | ‘...म्हणून त्यांनी घराणेशाहीबद्दल बोलण्याचे टाळले’

‘...म्हणून त्यांनी घराणेशाहीबद्दल बोलण्याचे टाळले’

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मी टीका केल्यानंतर त्यांनी बिहारमधील जमुई येथील सभेत घराणेशाहीच्या विरोधात एकही शब्द काढला नाही असा दावा त्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला.

तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी टीका केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर शरसंधान केले नाही. असे यापुढेही होणार असेल तर पंतप्रधानांनी कोणत्या विषयांवर टीका करू नये याची एक यादीच आम्ही तयार करून देऊ. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमधील जमुई येथे बुधवारी प्रचारसभा झाली. त्या दिवशी सकाळी तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर एक यादी प्रसिद्ध केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (रालोआ) कोणत्या नेत्यांनी घराणेशाही चालविली आहे याचा तपशील या यादीत देण्यात आला होता. त्याबद्दल राओलाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Web Title: '...so they avoided talking about dynasticism'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.