"राहुल गांधी एक जुमला...", भाजपा नेता 'द ग्रेट खली'चा काँग्रेसवर थेट हल्ला; PM मोदींबद्दल काय म्हणाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 08:27 PM2024-04-21T20:27:40+5:302024-04-21T20:28:23+5:30

"राहुल गांधी स्वतः एक 'जुमला' झाले आहेत. त्यांना नेमके काय करायचे आहे, हेच माहीत नाही. ते (राहुल गांधी) जेव्हा पूर्णपणे अपयशी ठरले, तेव्हा काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाध्यक्ष केले."

rajasthan lok sabha election 2024 BJP leader the great khali and former wwe wrestler says rahul gandhi is a jumla | "राहुल गांधी एक जुमला...", भाजपा नेता 'द ग्रेट खली'चा काँग्रेसवर थेट हल्ला; PM मोदींबद्दल काय म्हणाला? 

"राहुल गांधी एक जुमला...", भाजपा नेता 'द ग्रेट खली'चा काँग्रेसवर थेट हल्ला; PM मोदींबद्दल काय म्हणाला? 

भाजप नेते तथा माजी WWE रेस्लर दलीप सिंग राणा उर्फ ​​'द ग्रेट खली'ने रविवारी थेट राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवत त्यांना 'जुमला' म्हटले आहे. राहुल गांधी स्वतः एक 'जुमला' झाले आहेत. त्यांना नेमके काय करायचे आहे, हेच माहीत नाही. ते (राहुल गांधी) जेव्हा पूर्णपणे अपयशी ठरले, तेव्हा काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाध्यक्ष केले. खरगे यांना अपमानाचा सामना करण्यासाठी पुढे आणले आहे. खली राजस्थानातील बाडमेर येथे एएनआयसोबत बोलत होते.

खली म्हणाला, राहुल गांधी यांनी आधीच पराभव स्वीकारला आहे. यामुळेच खर्गे यांना पुढे करण्यात आले आहे. ते शर्यतीतून बाहेर पडले आहेत. बाडमेर, जैसलमेर येथून विद्यमान खासदार कैलाश चौधरी यांच्या समर्थनार्थ राणा लोकसभा निवडणुकीत प्रचार करत आहेत. कैलाश चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार उमेदा राम बेनिवाल आणि अपक्ष रवींद्र सिंह भाटी यांच्या विरोधात लढत आहेत. 

याचवेळी, भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार असे तर, विकास होईल आणि मला विश्वास आहे की, भाजप दोन्ही ठिकाणी सरकार स्थापन करेल, असेही 'द ग्रेट खली'ने म्हटले आहे.

"केंद्र आणि राज्य पातळीवर भाजपचे सरकार आल्यास विकास होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे केले ते श्रीमंतांना मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा गोष्टी केल्या आहेत ज्यांचा विचारही लोकांनी केला नसेल. खरे तर ज्या व्यक्तीने गरिबी पाहिली आहे, अशीच व्यक्ती गरिबांच्या कल्याणासाठी एवढी सारी कामे करू शकते," असेही खलीने म्हटले आहे.
 

Web Title: rajasthan lok sabha election 2024 BJP leader the great khali and former wwe wrestler says rahul gandhi is a jumla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.