Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:54 IST2025-05-08T17:53:04+5:302025-05-08T17:54:19+5:30
Protest Against Karachi Bakery Hyderabad: कराची बेकरीच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सुरक्षा.

Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
India-Pakistan Tension : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील प्रसिद्ध कराची बेकरी (Karachi Bakery) पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. बेकरीचे नाव पाकिस्तानच्या कराची प्रांताच्या नावावरुन असल्याने, लोक त्याचा निषेध करत असून, नाव बदलण्याची मागणी करत आहेत. याबाबत बेकरी व्यवस्थापनाने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि पोलिस प्रशासनाकडे संरक्षण मागितले आहे.
VIDEO | Protests erupt in Hyderabad against a bakery named after Karachi. The owner clarifies and says, "Karachi Bakery was founded here in Hyderabad in 1953 by Khanchand Ramnani, who migrated to India during the Partition. It has been 73 years. Our grandfather named it after… pic.twitter.com/i6dAkwxDIR
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2025
दुकानांवर तिरंगा लावला...
'कराची बेकरी' हा हैदराबादचा एक प्रसिद्ध कुकीज ब्रँड आहे. ते देशभरात त्याच्या उस्मानिया बिस्किटांसाठी ओळखले जाते. हैदराबाद शहरातील सामान्य लोकांमध्ये हे चहा कॅफे म्हणून लोकप्रिय आहे. शहरात 'कराची बेकरी'ची सुमारे 20 दुकाने आहेत. जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतो, तेव्हा 'कराची बेकरी'चे व्यवस्थापन शहरातील त्यांच्या सर्व शाखांवर 'तिरंगा' लावते. आता सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराची बेकरीने आपल्या सर्व दुकनांवर तिरंगा लावला आहे. कंपनी लोकांमध्ये हा संदेश देखील देते की, हा पूर्णपणे भारतीय ब्रँड आहे.
कराची बेकरीने आपल्या दुकानांवर लावलेले पोस्टर-
20 देशांमध्ये पसरलेला व्यवसाय
'कराची बेकरी' त्याच्या 'ओस्मानिया बिस्किट'साठी सर्वात प्रसिद्ध आहे. कंपनी 20 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. कंपनी दररोज 10 टनांपेक्षा जास्त बिस्किटे तयार करते. तर हैदराबादमध्ये त्यांच्या प्रत्येक दुकानात दररोज सरासरी 2000 लोक येतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कराची बेकरी'चा वार्षिक महसूल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हिंदू मालकाने ठेवले कराची नाव
'कराची बेकरी' 1953 मध्ये खानचंद रामनानी नावाच्या एका सिंधी हिंदू कुटुंबाने सुरू केली होती. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब कराची, पाकिस्तानहून हैदराबादला आले. यामुळे त्यांनी त्यांच्या बेकरीचे नाव 'कराची' ठेवले.