अनेकांची नावं मतदार यादीतून 'गायब'! फेरमतदानाची मागणी करणार; तामिळनाडू भाजपाध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:05 PM2024-04-19T23:05:07+5:302024-04-19T23:06:06+5:30

तामिळनाडूतील सर्वच्या सर्व 39 जागांवर आज (शुक्रवारी) मतदान झाले. मात्र यातच, अनेक मतदारांकडून, आपले नाव मतदार यातीत नाही, अशा ...

Many names are 'disappearing' from the voter list will demand a re-poll; Tamil Nadu BJP president's claim | अनेकांची नावं मतदार यादीतून 'गायब'! फेरमतदानाची मागणी करणार; तामिळनाडू भाजपाध्यक्षांचा दावा

अनेकांची नावं मतदार यादीतून 'गायब'! फेरमतदानाची मागणी करणार; तामिळनाडू भाजपाध्यक्षांचा दावा

तामिळनाडूतील सर्वच्या सर्व 39 जागांवर आज (शुक्रवारी) मतदान झाले. मात्र यातच, अनेक मतदारांकडून, आपले नाव मतदार यातीत नाही, अशा तक्रारी आल्या आहेत. असा दावा तामिळनाडूभाजपाध्यक्ष के अन्नामलाई यांनी शुक्रवारी केला.  एवढेचन नाही  तर, “ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे गायब आहेत, अशा ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत,” असेही अन्नामलाई यांनी म्हटले आहे. 

अन्नामलाई हे कोईम्बतूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. काही राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकार घडल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज (19 एप्रिल) रोजी तामिळनाडूमधील सर्व 39 लोकसभा जागांसाठी मतदान पार पडले. येथे एकूण 62.19 टक्के मतदान झाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत DMK च्या नेतृत्वाखालील आघाडीने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेकवेळा तमिळनाडूचा दौरा केला, कारण भाजप येथे आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रमुख दावेदार अजूनही, सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) हेच आहेत.

Web Title: Many names are 'disappearing' from the voter list will demand a re-poll; Tamil Nadu BJP president's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.