हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:47 IST2025-05-19T09:43:43+5:302025-05-19T09:47:44+5:30

हैदराबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. ISIS शी संबंधित दोन दहशतवादी हैदराबादमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

Major conspiracy foiled in Hyderabad, two arrested with links to ISIS bomb-making materials seized | हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. सर्व राज्यांच्या पोलिसांना अतिरिक्त सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रासह ६ जणांना अटक करण्यात आली. आता हैदराबाद पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय सूरज उर रहमान आणि २८ वर्षीय सय्यद समीर हे हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. दोघेही सौदी अरेबियास्थित आयसिसच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात

पोलिसांनी दोन्ही आरोपींना आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथून अटक केली आहे. यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम रहमानला अटक केली. पोलिस चौकशीदरम्यान, रहमानने संपूर्ण सत्य उघड केले आणि सय्यद समीरचे नावही घेतले, त्यानंतर पोलिसांनी समीरला हैदराबाद येथून ताब्यात घेतले.

बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान आणि सईद यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली. दोघांच्याही घरातून बॉम्ब बनवण्यासाठी वापरला जाणारा अमोनिया, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडर जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत. 

याआधी पोलिसांनी देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ६ जणांना अटक केली होती. या यादीत युट्यूबर ज्योती मल्होत्राचे नावही समाविष्ट आहे. या सर्वांवर आयसिसचे गुप्तचर एजंट असल्याचा आरोप आहे. ज्योतीवर आयसिसच्या गुप्तचर एजंट्सच्या संपर्कात राहण्याचा आणि भारताची अनेक संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवण्याचा आरोप आहे.

Web Title: Major conspiracy foiled in Hyderabad, two arrested with links to ISIS bomb-making materials seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.