"400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 09:11 AM2024-04-20T09:11:28+5:302024-04-20T09:12:54+5:30

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Lok Sabha Elections 2024 kanpur lok sabha seat bjp Prakash Sharma letter to Narendra Modi goes viral | "400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप

"400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. कानपूर लोकसभा जागेवर चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र या जागेवर भाजपामधील लढत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपाने कानपूरच्या जागेवर रमेश अवस्थी हा नवा चेहरा दिला आहे, मात्र या नावाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत कानपूरमधील भाजपाचे माजी उपाध्यक्ष, वीएचपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय संयोजक, ज्येष्ठ नेते प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कानपूरमधील उमेदवाराच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, 400 पारचा संकल्प पूर्ण करणं अवघड आहे.

कोण आहेत प्रकाश शर्मा?

कानपूरच्या दिग्गज नेत्यांमध्ये प्रकाश शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी भाजपा, वीएचपी, बजरंग दल अशा अनेक मोठ्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. शहराच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणातही त्यांचा सहभाग आहे, मात्र कानपूर मतदारसंघासाठी उमेदवार रमेश अवस्थी यांच्या निवडीबाबत आणि निवडणूक लढवल्यावर होणाऱ्या नुकसानाबाबत भाजपाने पंतप्रधानांना पत्र लिहिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. 

पंतप्रधानांना लिहिलेलं हे पत्र व्हायरल झालं असून, त्यात कानपूरची भूमी क्रांतिकारकांची भूमी असल्याचं म्हटलं आहे. "या भूमीतून जनसंघ आणि भाजपासाठी मैदान तयार करण्यात आलं आहे. येथे पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्येही नाही. रमेश अवस्थी यांनी भाजपाचे सदस्यत्व कधी घेतले आणि पक्षासाठी काय योगदान दिले, याची माहितीही येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना नाही."

"कानपूरची भूमी कार्यकर्ता विरहित झाली आहे का? पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले असून ते अंतर्गत धुमाकूळ घालत आहेत. असेच चालू राहिले तर पंतप्रधानजी, तुमचा 400 पारचा संकल्प अपूर्णच राहील" असं पत्रात म्हटलं आहे. कानपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार आहेत. पण, त्याआधीच या पत्रावरून वाद सुरू झाला असून भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: Lok Sabha Elections 2024 kanpur lok sabha seat bjp Prakash Sharma letter to Narendra Modi goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.