लोकसभा निवडणुकीवर दहशतवादाचे सावट, भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 07:16 PM2024-03-21T19:16:39+5:302024-03-21T19:17:21+5:30

LokSabha Election 2024: दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

Lok Sabha Election 2024: Threat of Terrorism on Lok Sabha Elections, Alert Issued on India-Pakistan Border | लोकसभा निवडणुकीवर दहशतवादाचे सावट, भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी

लोकसभा निवडणुकीवर दहशतवादाचे सावट, भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी

LokSabha Election 2024: देशात  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुढील दोन महिने संपूर्ण देशात निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानीदहशतवादी लोकसभा निवडणुकीत व्यत्यय निर्माण करण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. 

दोडा जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आर.आर. स्वेन म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले जाईल. निवडणुकीच्या काळात सुरक्षा महत्त्वाची बाब आहे. निवडणुकीदरम्यान मतदार, उमेदवार आणि नेत्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशा कडक सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत.

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना....
सुरक्षा एजन्सी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा समुळ नाष करण्यापासून आता दूर नाही. राज्यात येणारी केंद्रीय दले, तसेच इतर सुरक्षा दलांच्या तैनातीसाठी आम्ही केंद्राशी चर्चा करत आहोत. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास किंवा ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवण्यात मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दहशतवाद्यांना मदत करताना जो कोणी सापडला, त्याला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान
जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत. 19 एप्रिलला उधमपूर, 26 एप्रिलला जम्मू, 7 मे रोजी अनंतनाग-राजौरी, 13 मे रोजी श्रीनगर आणि 20 मे रोजी बारामुल्ला येथे मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होईल. 

Web Title: Lok Sabha Election 2024: Threat of Terrorism on Lok Sabha Elections, Alert Issued on India-Pakistan Border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.