Priyanka Gandhi : Video - "जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 02:35 PM2024-04-17T14:35:59+5:302024-04-17T14:51:22+5:30

Lok Sabha Election 2024 And Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत रॅलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हजारो लोकांची गर्दी पाहून त्या भावूक झाल्या. 

Lok Sabha Election 2024 Priyanka Gandhi reached saharanpur became emotional after seeing crowd | Priyanka Gandhi : Video - "जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

Priyanka Gandhi : Video - "जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी बुधवारी सहारनपूरमध्ये पोहोचल्या. येथे त्यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार इमरान मसूद यांच्या समर्थनार्थ रॅली काढली. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत रॅलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हजारो लोकांची गर्दी पाहून त्या भावूक झाल्या. 

"सहारनपूर, उत्तर प्रदेशमधील लोकांचे हे प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. हा उत्साह, हा जोश परिवर्तनाची चाहूल आहे. बेरोजगारी आणि महागाईने निराश झालेल्या लोकांना आता बदलाची आशा दिसू लागली आहे. हा उत्साह त्या आशेची झलक आहे. जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित आहे. जुड़ेगा भारत, जीतेगा इंडिया" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

यापूर्वी रोड शोमध्ये प्रियंका यांनी "आज जे सत्तेत आहेत ते मातृशक्ती आणि सत्याचे उपासक नाहीत, ते 'सत्तेचे' उपासक आहेत. सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जातील. सत्तेसाठी ते सरकार पाडतील, आमदार विकत घेतील आणि देशाची संपत्ती श्रीमंतांना देतील. ही आपल्या देशाची परंपरा नाही" असं म्हटलं आहे. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 Priyanka Gandhi reached saharanpur became emotional after seeing crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.