'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 04:29 PM2024-04-04T16:29:08+5:302024-04-04T16:47:11+5:30

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कूचबिहार येथील रॅलीत भाजपावर जोरदार टीका केली.

Lok Sabha Election 2024 Chief Minister Mamata Banerjee criticized BJP | 'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकांची देशात जोरदार तयारी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रॅलीला सुरुवात केली आहे. आज कूचबिहार येथील रॅलीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की,  तुम्हाला तुमच्या विजयावर एवढा विश्वास आहे तर मग तुम्ही छापेमारी का करत आहात. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आदर्श आचारसंहिता पाळत नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. 'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, पण भाजपवर नाही, असा टोला बॅनर्जी यांनी भाजपाला लगावला.

राहुल गांधींची शेअर मार्केट अन् सोन्यातही मोठी गुंतवणूक; 'या' कंपन्याचे स्टॉक्स खरेदी

ममता बॅनर्जी म्हणाल्या, तुम्ही निवडणूक आयोग विकत घेतला आहे का, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. भाजपमध्ये असणे म्हणजे तुमचे चारित्र्य स्वच्छ आहे आणि तृणमूलमध्ये असणे म्हणजे तुम्ही घाणेरडे आहात, असंही बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप तुम्हाला घर योजनेसाठी पुन्हा नाव नोंदवण्यास सांगत आहे, तुम्ही पुन्हा नाव का नोंदवायचे. वास्तविक त्यांना नामांकन हवे आहे, जेणेकरून नावे कापता येतील. तुम्ही विषारी सापावर विश्वास ठेवू शकता, तुम्ही त्याला पाळू शकता, पण भाजपवर कधीच विश्वास ठेवू नका, भाजप देशाला उद्ध्वस्त करत आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला.

"टीएमसी "केंद्रीय एजन्सींच्या धमकावण्या"पुढे झुकणार नाही, बॅनर्जींनी कूचबिहारमधील महिलांना १९ एप्रिलच्या निवडणुकांपूर्वी "बीएसएफकडून स्थानिक लोकांवर अत्याचाराच्या घटना" झाल्यास निषेध करण्याचे आवाहन केले. त्यांनी तक्रार नोंदवावी. केंद्रीय तपास यंत्रणा, एनआयए, आयकर, बीएसएफ आणि सीआयएसएफ भाजपसाठी काम करत आहेत, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला.

Web Title: Lok Sabha Election 2024 Chief Minister Mamata Banerjee criticized BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.