'अयशस्वी भव'! वडिलांच्या शापवाणीमुळे पाठनमिठ्ठीथा मतदारसंघात मुलाचा पराभव हाेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 08:08 AM2024-04-23T08:08:06+5:302024-04-23T08:08:55+5:30

ॲण्टो अण्टोनी २००९ सालापासून म्हणजेच हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून खासदार म्हणून निवडून येत आहेत.

Kerala Lok Sabha Election - Pathanmitthitha Constituency A. K. Antony's son Anil is contesting elections from BJP | 'अयशस्वी भव'! वडिलांच्या शापवाणीमुळे पाठनमिठ्ठीथा मतदारसंघात मुलाचा पराभव हाेणार?

'अयशस्वी भव'! वडिलांच्या शापवाणीमुळे पाठनमिठ्ठीथा मतदारसंघात मुलाचा पराभव हाेणार?

डॉ. वसंत भोसले

पाठनमिठ्ठीथा : यंदा पाठनमिठ्ठीथा मतदारसंघ प्रकाशझोतात आला वडिलांनी ‘अयशस्वी भव’ म्हणून मुलाला दिलेल्या आशीर्वादाने. काँग्रेसचे खंदे नेते आणि माजी संरक्षणमंत्री  ए. के. ॲण्टोनी हे ते वडील. त्यांचा मुलगा अनिल याने भाजपमध्ये प्रवेशच केला नाही व पाठनमिठ्ठीथा मतदारसंघातून उमेदवारीही मिळवली आहे. 

काँग्रेसचे विद्यमान खासदार ॲण्टो ॲण्टोनी, सीपीआयचे टी. एम. थॉमस आयसॅक यांच्याविरोधात शर्यतीत उडी घेत त्यांनी निवडणुकीत वेगळेच रंग भरले आहेत.  ॲण्टो अण्टोनी २००९ सालापासून म्हणजेच हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदा मात्र अनील यांचे त्यांना आव्हान आहे. ॲण्टो ॲण्टोनी यांचे मताधिक्य  सातत्याने घटत असल्याने त्यांची चिंताही वाढली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर भाजप जनतेसमाेर मतांसाठी जात आहे.
त्याचवेळी केरळमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असाल्याचा मुद्दा विराेधक उपस्थित करत आहेत.
शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर न मिळणे
आयटी पार्कअभावी तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागते

 २०१९ मध्ये काय घडले?

ॲण्टो ॲण्टोनी
काॅंग्रेस (विजयी)
३,८०,९२७

वीणा जॉर्ज
माकप
३,३६,६८४

Web Title: Kerala Lok Sabha Election - Pathanmitthitha Constituency A. K. Antony's son Anil is contesting elections from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.