Karwa Chauth 2022: भाजपचे खासदार, त्यांच्या दोन पत्नी; करवा चौथ एकत्रच साजरा करतात, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 10:38 IST2022-10-14T10:37:44+5:302022-10-14T10:38:18+5:30
अर्जुनलाल मीणा यांचे लग्न दोन महिलांशी झाले आहे. मीनाक्षी ही त्यांची पहिली पत्नी, तर राजकुमारी ही त्यांची दुसरी पत्नी आहे.

Karwa Chauth 2022: भाजपचे खासदार, त्यांच्या दोन पत्नी; करवा चौथ एकत्रच साजरा करतात, कारण...
करवा चौथ देशभरातील विवाहित महिला मोठ्या श्रद्धेने पार पाडतात. या दिवशी महिला आपल्या पतीला ओवाळतात, त्याचा चेहरा चंद्राच्या छायेत चाळणीतून पाहतात. असे एक खासदार महाशय आहेत, ज्यांच्या दोन्ही पत्नी त्यांना एकत्रच ओवाळतात. राजस्थानच्या उदयपूरचे भाजपाचे खासदार अर्जुनलाल मीणा सध्या चर्चेत आहे, ते याचसाठी. गुरुवारी मीणा यांना त्यांच्या दोन्ही पत्नींनी एकत्रच ओवाळले.
अर्जुनलाल मीणा यांचे लग्न दोन महिलांशी झाले आहे. मीनाक्षी ही त्यांची पहिली पत्नी, तर राजकुमारी ही त्यांची दुसरी पत्नी आहे. या स्टोरीमध्ये एक गंमतीशीर भाग आहे. या दोघीही बहीणी आहेत. खासदारांची एक पत्नी शिक्षिका आहे, तर मीनाक्षी ही एका गँस एजन्सीची मालकीन आहे.
अर्जुनलाल मीणा हे २०१४ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांना उदयपूरच्या जनतेने २०१९ मध्ये पुन्हा निवडून दिले. राजस्थानच्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठातून एम.कॉम, बीएड आणि एलएलबी केलेले अर्जुनलाल मीणा 2003 ते 2008 या काळात आमदारही राहिले आहेत. गुरुवारी (13 ऑक्टोबर) करवा चौथचा सण होता. हिंदू धर्मात करवा चौथला विशेष महत्त्व आहे. हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्याची कामना करून निर्जला व्रत ठेवतात आणि चंद्र पाहून पतीची पूजा करतात.