कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढलं! बंडखोरीमुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासमोर मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 08:31 PM2024-04-12T20:31:04+5:302024-04-12T20:34:24+5:30

कर्नाटक भाजपचे बंडखोर नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी उमेदवारी दाखल करताच आता माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे.

karnataka lok sabha election 2024 eshwarappa submits nomination papers as independent candidate in shivamogga shivamogga | कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढलं! बंडखोरीमुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासमोर मोठं आव्हान

कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढलं! बंडखोरीमुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासमोर मोठं आव्हान

देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  कर्नाटकात आता भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.  कर्नाटक भाजपचे बंडखोर नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी शुक्रवारी शिवमोग्गा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत ईश्वरप्पा यांनी मोठ्या थाटामाटात उमेदवारी दाखल केला. 

आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

भाजपच्या आक्षेपानंतरही ईश्वरप्पा यांनी मिरवणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर आणि बॅनर वापरले. ईश्वरप्पा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याचे सांगितले. यामुळे आता माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्यासाठी हे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.

ईश्वरप्पा यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. शिवमोग्गा लोकसभा मतदारसंघातील सर्व ८ विधानसभा मतदारसंघातील सुमारे १५ ते २० हजार समर्थक त्यांच्यासोबत आले आणि त्यांना पाठिंबा दिला. यावेळी ईश्वरप्पा यांनी माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर निशाणा साधला. 'आजपासून मतदानाच्या दिवसापर्यंत आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करतील आणि माझ्यासारख्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय का झाला हे सांगतील. ही पार्टी पिता-पुत्रांच्या जाळ्यात अडकल्याचे बोलत त्यांनी टोला लगावला.

"मला विश्वास आहे की शिवमोग्गाचे मतदार मला निवडून देतील. निवडणुकीनंतर पक्षात बदल होतील आणि भाजपमध्ये साफसफाईची प्रक्रिया होईल, असंही ते म्हणाले. 

तिरंगी लढत होणार

येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र हे शिवमोग्गा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. कन्नड सुपरस्टार डॉ. शिवराजकुमार यांच्या पत्नी आणि दिवंगत एस. बंगारप्पा यांची कन्या गीता शिवराजकुमार या जागेवर काँग्रेसच्या उमेदवार आहेत. शिवमोग्गा या हायप्रोफाईल जागेवर आधीच निकराची लढत आहे आणि आता ईश्वरप्पा रिंगणात उतरल्याने ही लढत आणखीनच रंजक झाली आहे.

Web Title: karnataka lok sabha election 2024 eshwarappa submits nomination papers as independent candidate in shivamogga shivamogga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.