महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:59 IST2024-11-23T18:58:56+5:302024-11-23T18:59:36+5:30
Jharkhand Assembly Election 2024: आज झालेल्या दोन राज्यांतील मतमोजणीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. मात्र दुसरीकडे झारखंडमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.

महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
आज झालेल्या दोन राज्यांतील मतमोजणीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. मात्र दुसरीकडे झारखंडमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांपैकी ५५ जागांवर विजय मिळवत इंडिया आघाडीने स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला केवळ २५ जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना १ जागा मिळाली आहे.
झारखंडमध्ये बंपर विजय मिळवणाऱ्या इंडिया आघाडीला ८१ पैकी ५५ जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला ३४, काँग्रेसला १६, राजदला ४ आणि सीपीआयएमएल पक्षा २ जागा मिळाल्याआहेत.
तर एनडीएला २५ जागा मिळाल्या असून, त्यामध्ये भाजपाला २१ जागा मिळाल्या आहेत. तर एजेएसयू पक्षाला १, लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाला १, जनता दल युनायटेड पक्षाला १ आणि जेएलकेएम पक्षाला १ जागा मिळाली आहे.