गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 20:22 IST2025-07-21T20:20:58+5:302025-07-21T20:22:57+5:30

Indigo Flight Emergency Landing: इंडिगो विमान क्रमांक 6E 813 मध्ये 'कॅरेज वॉर्निंग' अलार्म वाजला

IndiGo flight 6E 813 operating from Goa to Indore on 21 July 2025 reported a technical snag just before landing 'carriage warning' alarm | गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास

गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास

Indigo Flight Emergency Landing: गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो फ्लाईट क्रमांक 6E 813 चे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात सुमारे १४० प्रवासी होते. विमान सुरक्षितपणे उतरले आहे. कॅरेजमधील वॉर्निंगमुळे हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. इंडिगोचे विमान गोव्याहून इंदूरला येत होते. ते संध्याकाळी ४.५५ वाजता इंदूरला पोहोचणार होते, पण विमान लँडिंग मोडमध्ये येताच, पायलटला कॅरेज अलर्टचा आवाज आला. पायलटने ताबडतोब एटीसीशी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली.

कॅरेज अलर्टचा आवाज म्हणजे नेमके काय?

इंदूरसाठी इंडिगो कंपनीचे 6E 813 क्रमांकाचे विमान निघाले होते. प्रवास करणारे एकूण १४० प्रवासी विमानात हजर होते. विमान गोव्याहून इंदूरसाठी उड्डाण घेऊन नीट निघाले. विमानातील प्रवाशांना किंवा क्रू मेंबर्सना सुरुवातील कसलीही अडचण आली नाही. संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी हे विमान इंदूरला उतरणार होते. पण त्याच वेळी विमान लँडिंग मोडमध्ये येताच, पायलटला 'कॅरेज अलर्ट'चा आवाज आला. कॅरेज अलर्ट म्हणजेच विमानाच्या लँडिंगसाठी असणाऱ्या चाकांमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत मिळाले. पायलटने हा प्रकार पाहताच ताबडतोब संबंधिक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली.

विमान सुरक्षित उतरले

आपत्कालीन लँडिंगसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आणि विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. पायलटने योग्य वेळी या अलर्टकडे लक्ष दिल्याने महत्त्वाच्या क्षणी मोठा अनर्थ टळला. विमानाचे आपात्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर विमान कंपनीचे अभियंते त्याची दुरुस्ती करत आहेत. या दुरुस्तीनंतर हे विमान रायपूरला रवाना होणार आहे.

कालही इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड

रविवारी संध्याकाळी आंध्र प्रदेशातील तिरुपतीहून तेलंगणाची राजधानी हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक बिघाड झाला. परिणामी, तिरुपतीहून उड्डाण घेतल्यानंतर विमान सुमारे ४० मिनिटे आकाशात घिरट्या घालत राहिले आणि नंतर विमानाचे तिरुपतीमध्येच आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते हैदराबादच्या दिशेने नेण्यात आले नाही. यावेळी विमानात उपस्थित असलेले प्रवासी खूप घाबरले होते. पण अखेर ४० मिनिटांनंतर विमान तिरुपतीमध्येच सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

Web Title: IndiGo flight 6E 813 operating from Goa to Indore on 21 July 2025 reported a technical snag just before landing 'carriage warning' alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.