Hyderabad News: नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, हैदराबादमध्ये घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 10:24 IST2022-02-11T10:24:39+5:302022-02-11T10:24:53+5:30

Hyderabad News: तेलंगणातील हैदराबादमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Hyderabad News: Street Dog raped in Hyderabad, incident captured in CCTV | Hyderabad News: नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, हैदराबादमध्ये घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Hyderabad News: नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, हैदराबादमध्ये घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना

हैदराबाद:तेलंगणा(Telangana) राज्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद(Hyderabad) मध्ये एका 58 वर्षीय माणसाने रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार (Street Dog Raped) केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना हैदराबादच्या नल्लाकुंटा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या घृणास्पद प्रकाराबद्दल एका प्राणीप्रेमीने त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये आरोपीला रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार करताना प्राणीप्रेमींनी पाहिले, त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

अधिक तपास सुरू
या घटनेनंतर समाजातील महिलांसोबतच आता प्राणीदेखील सुरक्षित नसल्याची भावना प्राणीप्रेमीने व्यक्त केली आहे. तसेच, अशा लोकांना तुरुंगात टाकावे, त्यांचे बाहेर राहणे धोक्याचे असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. गेल्या मंगळवारी घडलेल्या या घटनेचा खुलासा आता झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Hyderabad News: Street Dog raped in Hyderabad, incident captured in CCTV