हरयाणा: तू नहीं तो कोई और सही... भाजपाने JPPची साथ सोडली, ६ अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:01 PM2024-03-12T14:01:53+5:302024-03-12T14:05:13+5:30

कोण आहेत ते ६ अपक्ष, काय आहे सत्तेचे गणित... जाणून घ्या

Haryana Political Drama Manohar Lal Khattar led BJP Govt to come in power with 6 independents know details of seats names all | हरयाणा: तू नहीं तो कोई और सही... भाजपाने JPPची साथ सोडली, ६ अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेत!

हरयाणा: तू नहीं तो कोई और सही... भाजपाने JPPची साथ सोडली, ६ अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेत!

Haryana Political Drama BJP: हरियाणामध्ये एका वेगळेच राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. भाजप-जेजेपी युती तुटल्याने मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या भाजप मंत्र्यांसह राजीनामा दिला. मंगळवारी सकाळी भाजप आणि जेजेपीने आपापल्या आमदारांची बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या जागावाटपावरुन भाजप-जेजेपी युतीमध्ये तणाव दिसून आला. त्यामुळे भाजपा-जेपीपी युती तुटली. सध्या हरियाणामध्ये 90 सदस्यीय विधानसभेत भाजपकडे 41, काँग्रेसकडे 30 आणि जेजेपीकडे 10 आमदार आहेत. बहुमतासाठी 46 आमदारांची गरज आहे. भाजपाला सातपैकी ६ अपक्षांचा पाठिंबा आहे असे सांगितले जाते. इंडियन नॅशनल लोक दल (INLD) आणि हरियाणा लोकहित पार्टीचे देखील विधानसभेत प्रत्येकी एक-एक सदस्य आहेत. अशा परिस्थितीत कोणते सहा अपक्ष भाजपला साथ देणार ते जाणून घेऊया.

काय आहे सत्तेचे गणित?

हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा 46 आहे. भाजपकडे 41 आमदार असून सहा अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. हरियाणा लोकहित पक्षाचे एकमेव आमदार गोपाल कांडा यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. जेजेपीने भाजपची साथ सोडल्यावर भाजपला ४८ आमदारांचा पाठिंबा राहणार आहे. म्हणजेच सरकार चालवताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

भाजपला सत्तेत पाठिंबा देणारे ते ६ अपक्ष आमदार कोण?

नयन पाल रावत
धरमपाल गोंदर
रणधीर सिंग गोलन
राकेश दौलताबाद
रणजित सिंग
सोंबीर सांगवान

हरियाणामध्ये नक्की काय बिनसलं?

जेजेपी नेते आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिल्लीत भाजप प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेतली. वृत्तानुसार, याच बैठकीत भाजपने जेजेपीसोबत लोकसभेची एकही जागा शेअर करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र जेपीपीला लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याने युती तुटली.

जेपीपीचे टेन्शन वाढलं...

रिपोर्ट्सनुसार, जेजेपी हरियाणाच्या नव्या सरकारमध्ये सहभागी होणार नाही. मात्र, चौटाला यांच्यासाठी तणावाचे आणखी एक कारण आहे. जेजेपीचे चार आमदार पक्ष बदलू शकतात. दुष्यंत यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि दहा आमदारांची नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. मात्र, अद्याप चार आमदार आलेले नाहीत. यामध्ये नारनौंदचे आमदार राम कुमार गौतम, बरवालाचे आमदार जोगी राम सिहाग, गुहला आमदार ईश्वर सिंह आणि जुलनाचे आमदार अमरजीत धांडा यांचा समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांचा हवाला देत लिहिले की दुष्यंतचा जवळचा सहकारी देवेंदरसिंग बबली देखील या बंडखोर गटाचा एक भाग आहे.

या वर्षी हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊ शकतात.

Web Title: Haryana Political Drama Manohar Lal Khattar led BJP Govt to come in power with 6 independents know details of seats names all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.