इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:11 IST2025-11-17T13:09:35+5:302025-11-17T13:11:04+5:30
Gold Smuggler: सोने लपवण्याची पद्धत पाहून अधिकारीही चकीत झाले.

इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
Gold Smuggler: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीची धक्कादायक घटना समोर आली आहे. शारजाहहून भारतात परतलेल्या एका प्रवाशाला DRI (Directorate of Revenue Intelligence) पथकाने अटक केली. हे संपूर्ण ऑपरेशन गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आले.
Gold Smuggler: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीची घटना समोर आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या हैदराबाद झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (14 नोव्हेंबर २०२५) शारजाहहून परतलेल्या तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आले. त्याने अतिशय हुशारीने हे सोने सामानात लपवले होते.
#DRI HZU officers intercepted passenger arriving from #Sharjah at #Hyderabad’s RGI Airport on Nov 14, seized 11 foreign-marked gold bars valued at Rs 1.5 cr, weighing 1196.20 grams. Based on his confession, his #AndhraPradesh-based handler arrested in #Proddatur. pic.twitter.com/OxysJaYKfq
— Neelima Eaty (@NeelimaEaty) November 16, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवाशाने लोखंडी इस्त्रीमध्ये सोन्याची बिस्कीटे लपवली होती. मात्र, अधिकाऱ्यांना अधिच या तस्करीची माहिती मिळाल्यामुळे, त्याचा भांडाफोड झाला. डीआरआयच्या पथकाने कसून चौकशी केली असता, तस्कराने एका स्थानिक हँडलरचे नाव घेतले. त्यानंतर, नेल्लोर सब-झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि आंध्र प्रदेशातील वायएसआर जिल्ह्यातील प्रोद्दातुर येथील आरोपीला ताब्यात घेतले.
सोन्याचे मूल्य: ₹1.55 कोटी
जप्त केलेल्या सोन्याचे वजन 1196.20 ग्रॅम असून, त्याचे मूल्य अंदाजे ₹1.55 कोटी आहे. हे सोने सीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलम 110 अंतर्गत जप्त करण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही आरोपींना सीमाशुल्क कायद्याच्या कलम 104 अंतर्गत अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पुढील तपासात आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचा महत्त्वाचा रुट उघड होण्याची शक्यता आहे.