निवडणूक निकाल सांगणारा पोपट सापडला; ज्योतिषाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 08:49 IST2024-04-11T08:48:37+5:302024-04-11T08:49:22+5:30
तामिळनाडूत उमेदवाराचे भवितव्य पोपटाच्या साह्याने सांगण्याचा प्रयत्न एका ज्योतिषाने केला

निवडणूक निकाल सांगणारा पोपट सापडला; ज्योतिषाला अटक
चेन्नई : लोकसभे पहिल्या टप्प्यातील मतदानाला आठवडाभराचा अवधी बाकी आहे, परंतु तत्पूर्वीच एका उमेदवाराच्या विजयाचे भवितव्य सांगणारा पोपट सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेत ज्योतिषाला अटक केली. हा प्रकार तामिळनाडूत घडला.
तामिळनाडूत उमेदवाराचे भवितव्य पोपटाच्या साह्याने सांगण्याचा प्रयत्न एका ज्योतिषाने केला. सेल्वाराज या ज्योतिषाचा पट्टाली मक्कल काची (पीएमके)पक्षाचा उमेदवार थांगार बचन यांच्या विजयाचे भाकीत करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांनी सेल्वाराजला पोपटाला पिंजऱ्यात ठेवल्याच्या आरोपावरून अटक केली. ताकीद देऊन काही वेळाने सोडले.
व्हायरल व्हिडीओत काय होते?
व्हिडीओत ज्योतिषाने इशारा करताच पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतो व बचनने काही तासांपूर्वी ज्या देवतेची पूजा केली त्या देवतेचा फोटो असलेले कार्ड काढतो. कार्डच्या मागे बचन विजयी होतील, असे लिहिलेले होते.