चंद्रपूरच्या रस्सीखेचीत अखेर प्रतिभा धानोरकर यांची सरशी, पहिल्या टप्प्यातील पाचही उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 10:49 IST2024-03-25T10:43:37+5:302024-03-25T10:49:40+5:30

धानोरकर यांच्या उमेदवारीच्या घोषणेसह आता राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाचही जागांसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. 

Finally, Pratibha Dhanorkar's Sarshi in the tug of war of Chandrapur, all the five candidates of the first phase have been announced | चंद्रपूरच्या रस्सीखेचीत अखेर प्रतिभा धानोरकर यांची सरशी, पहिल्या टप्प्यातील पाचही उमेदवार जाहीर

चंद्रपूरच्या रस्सीखेचीत अखेर प्रतिभा धानोरकर यांची सरशी, पहिल्या टप्प्यातील पाचही उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सरतेशेवटी आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. या जागेसाठी अनेक आठवड्यांपासून आमदार धानोरकर व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यात चुरस निर्माण झाली होती. अखेर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी बाजी मारली.

धानोरकर यांच्या उमेदवारीच्या घोषणेसह आता राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाचही जागांसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. 
काँग्रेसने राजस्थानच्या जयपूरमधून वादग्रस्त सुनील शर्मा यांची उमेदवारी मागे घेतली असूुन त्यांच्या जागी प्रतापसिंह खचरियावास यांच्या नावाची घोषणा केली आहे. राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून काँग्रेसने मुराली लाल मीणा या तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केली. 

Web Title: Finally, Pratibha Dhanorkar's Sarshi in the tug of war of Chandrapur, all the five candidates of the first phase have been announced