डाॅ. अंशुल अविजित vs रविशंकर प्रसाद... पाटण्यात यंदा अभिनेत्यांची नव्हे, नेत्यांचीच लढाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 12:30 PM2024-05-26T12:30:16+5:302024-05-26T12:31:44+5:30

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यापासून पाटणा मतदारसंघात सुरू झालेली अभिनेत्यांची राजकीय लढाई यावेळी थांबली आहे.

Dr. Anshul Avijit vs Ravi Shankar Prasad This year in Patna Sahib the battle is not for actors, but for leaders! | डाॅ. अंशुल अविजित vs रविशंकर प्रसाद... पाटण्यात यंदा अभिनेत्यांची नव्हे, नेत्यांचीच लढाई!

डाॅ. अंशुल अविजित vs रविशंकर प्रसाद... पाटण्यात यंदा अभिनेत्यांची नव्हे, नेत्यांचीच लढाई!

राजेश शेगाेकार, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा (पाटणा साहेब-बिहार): अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यापासून पाटणा मतदारसंघात सुरू झालेली अभिनेत्यांची राजकीय लढाई यावेळी थांबली आहे. सिन्हा यांना पराभूत करणारे भाजपाचे हेवीवेट नेते रविशंकर प्रसाद हे दूसऱ्यांदा रिंगणात असून त्यांच्या विराेधात काॅंग्रेसच्या मिरा कुमारी यांचे पुत्र डाॅ. अंशुल अविजित मैदानात आहेत.

अभिनेत्यांच्या लढाईतही जातीय समिकरणे प्रभावी ठरली हाेती यावेळीही कायस्थ विरूद्ध कुशवाह असे चित्र रंगविले जात आहे. भाजपाची परंपरागत मतपेढी, जेडीयूची साथ, पासवान अशी माेट भाजपाला तारून नेईल असा अंदाज व्यक्त केला जाताे तर दूसरीकडे मिरा कुमारींचा  चेहरा व पतीचे कुशवाह कार्ड महागठबंधनची ताकद वाढवेल असा दावा केला असल्याने नेत्यांची लढाई चुरशीची आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे...

  • रविशंकर प्रसाद यांचा दिल्लीतील सर्वाधीक वावर पाहता ते ‘हवाई नेता’ आहेत असा काॅंग्रेसचा प्रचार
  • पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राेड शाे करून एनडीएमधील उत्साह वाढविला त्याचा फायदा हाेईल असा दावा भाजपकडून केला जात आहे.
  • कायस्थ मतदार सर्वाधीक असले तरी यादव, राजपूत व मागासवर्गीय  मतदारांची माेठी संख्या आहे यामतांमध्ये विभाजन टाळण्याचा काॅग्रेसचा प्रयत्न 

Web Title: Dr. Anshul Avijit vs Ravi Shankar Prasad This year in Patna Sahib the battle is not for actors, but for leaders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.