CoronaVirus Live Updates : धक्कादायक! रुग्णालयाने कोरोना मृतांचा आकडा लपवला; 19 दिवसांत तब्बल 65 जणांच्या मृत्यूने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:17 AM2021-05-15T09:17:19+5:302021-05-15T09:19:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

CoronaVirus Live Updates uttarakhand 65 patients died details revealed after 19 days in haridwar hospital | CoronaVirus Live Updates : धक्कादायक! रुग्णालयाने कोरोना मृतांचा आकडा लपवला; 19 दिवसांत तब्बल 65 जणांच्या मृत्यूने खळबळ

CoronaVirus Live Updates : धक्कादायक! रुग्णालयाने कोरोना मृतांचा आकडा लपवला; 19 दिवसांत तब्बल 65 जणांच्या मृत्यूने खळबळ

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरू आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एका खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

19 दिवसांत तब्बल 65 रुग्णांचा मृत्यू झाला मात्र रुग्णालयाने हे महत्त्वाची माहिती लपवून ठेवल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वार येथील बाबा बर्फानी रुग्णालय प्रशासनाने कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची नेमकी माहिती आरोग्य विभागाला दिलेली नाही. कोरोना रुग्णाच्या मृत्यूची सूचना ही 24 तासांच्या आत राज्याच्या कोविड कंट्रोल रुमला देण्याचे निर्देश सरकारच्या वतीने कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना देण्यात आले आहेत. बाबा बर्फानी रुग्णालयात 25 एप्रिल ते 12 मे पर्यंत उपचारादरम्यान 65 रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. 

रुग्णालयात 65 कोरोना रुग्णांचा मृत्य़ू झाला तरी त्याची माहिती ही राज्याच्या कोविड कंट्रोल रुमला देण्यात आलेली नाही. राज्याच्या कोविड कंट्रोल रुमचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. अभिषेक त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूची सूचना वेळेवर न दिल्यामुळे या प्रकरणाची दखल गंभीरतेने घेतली जात आहे. चौकशीतून मृत्यूबाबतची नेमकी माहिती उपलब्ध होईल. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 2,40,46,809 वर पोहोचली आहे. देशभरात तब्बल 2,62,317 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

आईला कोरोना झाल्याने 5 दिवसांच्या मुलीला सांभाळतोय 'बाबा'; रुग्णालयाबाहेर लेकीसह पाहतोय वाट

आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या बाळाची जबाबदारी वडिलांवर आली आहे. तेलंगणातील सिकंदराबादमध्ये ही घटना घडली आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने पाच दिवसांच्या मुलीला घेऊन पती रुग्णालयाबाहेर पत्नी लवकर बरी व्हावी म्हणून वाट पाहत असल्याची मन सुन्न करणारा प्रकार पाहायला मिळत आहे. कृष्णा असं या 20 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो मजूर आहे. पाच दिवसांपूर्वी त्याला मुलगी झाली आहे. मात्र याच दरम्यान पत्नीला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला उपचारासाठी तेलंगणातील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

लज्जास्पद! कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने केली सेक्सची मागणी 

देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना माणुसकीला काळीमा घटना समोर आली आहे. लोकांच्या हतबलतेचा, परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा भयंकर प्रकार ट्विटरवरून समोर आला आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates uttarakhand 65 patients died details revealed after 19 days in haridwar hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.