गुजरातसाठी भाजपाच्या स्टार प्रचारंकाच्या यादीत देवेंद्र फडणवीस; ४० जणांमध्ये महाराष्ट्राचे नेते किती? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 11:42 PM2024-04-13T23:42:58+5:302024-04-13T23:45:54+5:30

गुजरातमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

BJP announces list of star campaigners for Gujarat With PM Modi, Devendra Fadnavis | गुजरातसाठी भाजपाच्या स्टार प्रचारंकाच्या यादीत देवेंद्र फडणवीस; ४० जणांमध्ये महाराष्ट्राचे नेते किती? वाचा

गुजरातसाठी भाजपाच्या स्टार प्रचारंकाच्या यादीत देवेंद्र फडणवीस; ४० जणांमध्ये महाराष्ट्राचे नेते किती? वाचा

लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. भाजपानेही जोरदार तयारी केली आहे. भाजपाने सभांचा धडाका सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशात सभांचा धडाका सुरू केला आहे, तर दुसरीकडे भाजपाने गुजरातसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्र्रातीलही नेत्यांचा समावेश आहे.   

Madha Lok Sabha Election: पश्चिम महाराष्ट्राच राजकारण बदलणार! २००४ नंतर पहिल्यांदाच बडे नेते एकत्र; शरद पवार अन्...

गुजरातमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एचएम अमित शहा, ईएएम एस जयशंकर, सीएम भूपेंद्र पटेल, राज्य पक्षप्रमुख सीआर पाटील, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा समावेश आहे.

स्टार प्रचारकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचाही समावेश आहे. भाजपने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश केला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर त्यांचे नाव काढून टाकण्यात आले. स्टार प्रचारकांमध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांची नावे समाविष्ट करता येणार नाहीत, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते.

Web Title: BJP announces list of star campaigners for Gujarat With PM Modi, Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.