bhopal Congress leader's tongue collapses, BJP vows against female candidate by ajiy singh | काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल अपशब्द
काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल अपशब्द

भोपाळ - मध्य प्रदेशमधील लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा जवळ आला असून नेत्यांमध्ये प्रचाराचा चांगलाच जोर वाढला आहे. प्रचारवेळी बेताल वक्तव्य करणं हे जणू भाजपा नेत्यांची सवयच बनली आहे. मात्र, काँग्रेसचे उमेदवार माजी विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांनी भाजपाच्या महिला खासदाराबद्द बेताल वक्तव्य केलं आहे. भाजपा उमेदवार आणि विद्यमान खासदार रीती पाठक यांच्याबद्दल बोलताना सिंह यांची जीभ घसरली. 

लोकसभा निवडणुकांसाठी नुक्कड येथे प्रचारसभा घेत असताना अजयसिंह यांनी रिती पाठक यांच्यावर शाब्दीक हल्ला केला. अजयसिंह यांचा एक वादग्रस्त व्हीडिओ सोशल मीडियीवर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत, रीती पाठक यांना गेल्या निवडणुकीत भाजपाने तिकीट दिले. त्यावेळी, मोदींची लाट होती, सर्वजण 15 लाख रुपयांच्या चक्करमध्ये मोदींच्या पाठीशी राहिले. मात्र, खासदार झाल्यानंतर रीती पाठक आपल्या लोकांमध्ये फिरकल्याच नाहीत, यापुढेही येणार नाहीत. आपल्या खासदार निधीतूनही त्यांनी कुठलेही काम केलं नाही. तुम्हीच सर्वांनी त्यांचा अनुभव घेतलाय, की भैय्या वो ठीक माल नही, असे म्हणत सिंह यांनी रीती पाठक यांना चक्क माल असे संबोधले आहे. त्यामुळे सिंह यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दरम्यान, अजयसिंह यांच्या या वक्तव्यावरुन रीती पाठक यांनी अजयसिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे. अजय सिंह यांना माता-भगिनींचा सन्मान करता येत नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. 
 


Web Title: bhopal Congress leader's tongue collapses, BJP vows against female candidate by ajiy singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.