बाबा नाश्त्याला घरी या म्हणत संतांसोबतच मुलीने बनवला अश्लील व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 18:22 IST2020-07-11T18:20:56+5:302020-07-11T18:22:08+5:30
पोलिसांच्या माहितीनुसार, तथाकथित संत असलेल्या व्यक्तीला मुलीने बालाजी परिसरातील घरी बोलावले होते.

बाबा नाश्त्याला घरी या म्हणत संतांसोबतच मुलीने बनवला अश्लील व्हिडिओ
जोधपूर - राजस्थानमधील जोधपूर येथे एका तथाकथित संत महात्म्याने एका मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. या मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी या संतांवर जबरदस्ती अश्लील व्हिडिओ बनवून पैशांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कमिश्नरेटच्या सीएचबी ठाण्यात खटला दाखल केला आहे. त्यामध्ये, मुलगी व तिच्या कुटुंबीयांना आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तथाकथित संत असलेल्या व्यक्तीला मुलीने बालाजी परिसरातील घरी बोलावले होते. त्यानुसार, ते मुलीच्या घरी पोहोचले. त्यानंतर, संबंधित मुलीने या संत महात्म्यांना तिच्या रुममध्ये नेले, तेथे अगोदरच काहीजण बसले होते. तसेच, बिअरची बॉटल आणून या संतांना प्यावयास सांगितल्याचाही आरोप पीडित संतांनी केला आहे. विशेष म्हणजे बिअर पिण्यास नकार दिल्यानंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी या संतांना जबरदस्तीने बिअर प्यायला लावली. तसेच, संबंधित मुलीने संतांचे कपडे काढून तिच्याशी अश्लील वर्तनही केले.
संबंधित कुटुंबीयांनी मुलीसोबतच्या अश्लील हावभाव आणि प्रसंगाचा व्हिडिओ बनवून संतांना धमकी दिली. तसेच, 10 लाख रुपयांची मागणीही करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तुमच्या संत महात्म्याच्या प्रतिमेला या व्हिडिओमुळे धोका पोहोचेल, समाजात तुम्ही बदनाम व्हाल, असे मदत 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप पीडित संतानी केला आहे.
दरम्यान, तथाकथित संतांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली आहे.