ऐकावं ते नवलच! मोठ्या भावाच्या लग्नात ऐनवेळी धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 09:22 PM2023-01-27T21:22:52+5:302023-01-27T21:23:27+5:30

उत्तर प्रदेशमधील संभल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

At Aligarh in Uttar Pradesh, the younger brother was married at the same time as the elder brother's wedding   | ऐकावं ते नवलच! मोठ्या भावाच्या लग्नात ऐनवेळी धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ!

ऐकावं ते नवलच! मोठ्या भावाच्या लग्नात ऐनवेळी धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ!

Next

अलीगढ : उत्तर प्रदेशमधील संभलहूनअलीगढला निघालेल्या लग्नाच्या मिरवणुकीत एका मुलीने चांगलाच गोंधळ घातला. खरं तर मुलीच्या या गोंधळामुळे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर वादात आणि तणावात झाले. मुलीने नवरदेवावर तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आणखी अनेक धक्कादायक खुलासे केले. या घटनेनंतर उपस्थितांमध्ये एकच खळबळ माजली.

माहितीनुसार, संभल जिल्ह्यातील गुन्नौर कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातून अलीगढला वऱ्हाड जाणार होते. लग्नाच्या मिरवणुकीची तयारी जोरात सुरू होती, पण तेवढ्यात दिल्लीहून एक मुलगी तिथे पोहोचली. मिरवणुकीत पोहोचलेल्या तरुणीने बराच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि सांगितले की, पाच वर्षापूर्वी नवरदेव असलेल्या तरुणासोबत तिचा प्रेमविवाह झाला होता. तो तरुण आधी दिल्लीत तिच्यासोबत राहत होता, असा दावा संबंधित तरूणीने केला. 

तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ 
मिरवणुकीत हायव्होल्टेज ड्रामा झाल्याने नवरदेव मुलाच्या बाजूने आणि परिसरातील लोकांनी मुलीला शांत केले. पण, मुलगी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. त्यानंतर याबाबत पंचायत झाली. अनेक तासांच्या विचारमंथनानंतर पंचायतीने निर्णय देताना दोघांचे लग्न योग्य असून ते एकत्र राहणार असल्याचे सांगितले. 

मोठ्या भावाच्या ऐवजी धाकटा भाऊ 'मंडपात'
मुलीच्या गोंधळानंतर पंचायतीने निर्णय घेतला की, वर बनलेल्या तरुणाचे आणि मुलीचे आधीच लग्न झाले होते. मात्र लग्नाची मिरवणूक मधीच अडकल्याने प्रकरण तणावाचे वातावरण तयार झाले. अशा परिस्थितीत कुटुंबीय आणि पंचायतीने वधू पक्षाशी चर्चा केली, त्यानंतर मोठ्या भावाऐवजी लहान भावाचे लग्न लावण्याचे ठरले. अशाप्रकारे पंचायतीच्या निर्णयानंतर मोठ्या भावाऐवजी धाकट्या भावाच्या डोक्यावर फेटा बांधून वऱ्हाड अलिगढला गेले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: At Aligarh in Uttar Pradesh, the younger brother was married at the same time as the elder brother's wedding  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.