रात्रीच्या वेळी बसमध्ये तरूणीसोबत सेक्स करताना सापडला कंडक्टर; video viral होताच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 19:38 IST2023-07-01T19:37:45+5:302023-07-01T19:38:32+5:30

उत्तर प्रदेशातील लखनौ येथील हाथरसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

A video of a conductor having sex with a female passenger in a bus at Hathras depot in Lucknow, Uttar Pradesh is going viral  | रात्रीच्या वेळी बसमध्ये तरूणीसोबत सेक्स करताना सापडला कंडक्टर; video viral होताच कारवाई

रात्रीच्या वेळी बसमध्ये तरूणीसोबत सेक्स करताना सापडला कंडक्टर; video viral होताच कारवाई

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखनौ येथील हाथरसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राजधानी लखनौला जात असलेल्या हाथरस डेपोच्या बसमधील प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. खरं तर कंडक्टर चालत्या बसमध्ये तरूणीसोबत अश्लील कृत्य करत असतानाचा व्हिडीओ काही प्रवाशांनी काढला. लक्षणीय बाब म्हणजे ही घटना १० दिवसांपूर्वीची असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चालक आणि वाहक या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

 नको त्या अवस्थेत प्रवाशांनी पकडले
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हाथरसहून लखनौला जात असलेल्या या बसच्या मागच्या सीटवर कंडक्टर एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे आढळून आले. प्रवाशांची चाहूल लागल्याचे कळताच दोघांनीही चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. प्रवासी व्हिडीओ काढत असताना संबंधित कंडक्टरने व्हिडीओ काढण्यास नकार दिला पण संतप्त प्रवाशांनी त्याला खडेबोल सुनावले.

निलंबनाची कारवाई
दरम्यान, कंडक्टर प्रवाशांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो पण प्रवासी त्याला व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवून शांत करतात. अर्ध्या तासात ही बस आलमबाग बसस्थानक येत असल्याचे एक प्रवाशी सांगत आहे. यावरून ही घटना लखनौच्या आसपास घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. हाथरस डेपोचे एआरएम शशिरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुमारे १० दिवस जुना आहे. प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: A video of a conductor having sex with a female passenger in a bus at Hathras depot in Lucknow, Uttar Pradesh is going viral