Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:17 IST2026-01-14T15:16:44+5:302026-01-14T15:17:22+5:30
Nashik Municipal Election 2026 : पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या तसेच इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या सुमारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल या आशेने भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी महापौरांसह काही नगरसेवकांसह पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून एकून ७६ जणांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली. याशिवाय पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून उद्धवसेनेतूनही पाचजणांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या तसेच इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या सुमारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. सदर संबंधित व्यक्तींना भारतीय जनता पार्टीमधून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली. वैयक्तिक हितापेक्षा संघटन आणि पक्षाचे हित सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात काम करणे किंवा पक्षशिस्त मोडणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा देत या कारवायांमुळे प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल, तसेच पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांना ठाम संदेश जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षविरोधी कारवायांचा बसला फटका
पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल मसूद जिलाणी, राकेश साळुंके, संजय पिंगळे, सुवर्णा काळुंगे, नितीन पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे आदेश शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी पत्रकान्वये दिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यात म्हटले आहे.
निष्ठावंतांपेक्षा नवखेच जास्त....
या कारवाईत निष्ठावंतांपेक्षा केवळ उमेदवारी मिळेल म्हणून भाजपमध्ये दाखल झालेल्या काही दिवसांच्या पाहुण्यांचा भरणार जास्त आहे. या कारवाईत कमलेश बोडके, अमित घुगे, सतीष (बापू) सोनवणे, पूनम सोनवणे, रुची कुंभारकर, अशोक मुर्तडक, सुनीता
पिंगळे, शशिकांत जाधव, मीरा हांडगे, अंबादास पगारे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, पंडित आवारे, राजेश आढाव, अनिल मटाले, जितेंद्र चोरडिया, सचिन मोरे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, बाळासाहेब पाटील, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दीक्षित, दामोदर मानकर, रतन काळे, ऋषिकेश आहेर, ऋषिकेश द्वापसे, जहागीरदार नवाबखान, कैलास अहिरे, सतनाम राजपुत, गणेश मोरे, किरण गाडे, संदीप (अमोल) पाटील, मंगेश मोरे, शालिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगीता राऊत, अनंत औटे, अॅड. मिलिंद मोरे, राजश्री जाधव, साक्षी गवळी, चंचल साबळे, यमुना घुगे, बाळासाहेब घुगे, शीला भागवत, शंकर विधाते, प्रेम पाटील, राहत बेगम अहमद रजा काझी, वंदना मनचंदा, रत्ना सातभाई, यमुना वराडे, संजय गायकवाड, ऋषिकेश शिरसाठ, गीता वाघमारे, गुलाब माळी, सविता गायकर, नंदिनी जाधव, राहुल कोथमिरे, प्रमिला मैंद, शीतल साळवे, कन्हैया साळवे, तुळशी मरसाळे, तुषार सोळुंखे, दिलीप दातीर, शीला भागवत, तुळशिराम भागवत, सागर देशमुख, सोनाली नवले, एकनाथ नवले, रोहन देशपांडे यांचा समावेश आहे.