Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:33 IST2026-01-13T13:33:34+5:302026-01-13T13:33:56+5:30
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्यात शहरातील ठिकठिकाणच्या बिग फाइटसने मतदारांचे लक्ष वेधले आहे.

Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला
महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्यात शहरातील ठिकठिकाणच्या बिग फाइटसने मतदारांचे लक्ष वेधले आहे. त्यात कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांच नागरिकांसह राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. कुठे पक्षाचे नेते, उपनेते तर कुठे माजी महापौर, उपमहापौर यांनी लढती प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. सहाही विभागातील लढती निवडणुकीच्या तोंडावरील पक्षांतरे, विकासकामे, शेवटच्या दिवसात करत असलेला प्रचार यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.
अजय बोरस्ते विरुद्ध योगेश हिरे
दोन्ही उमेदवारांना राजकीय घराण्यांचा वारसा असल्याने प्रतिष्ठेची लढत होणार
बोरस्ते घराण्याचे वारस अजय बोरस्ते आणि भाजपतील हिरे घराण्याचा वारसा असलेले योगेश तथा मुन्ना हिरे यांची प्रभाग क्रमांता ७ मध्ये होणारी लढत अत्यंत लक्षवेधी असणार आहेत. पंडित कॉलनी, गंगापूररोडचा हा परीसर असून याठिकाणी दोघांची अत्यंत चुरशीची लढत होत आहे. दोघांमध्ये अजय बोरस्ते महापालिकेत अधिक सिनीयर तसेच बोरस्ते मूळचे भाजपचेच परंतु आता ते शिंदे सेनेचे उपनेते आहेत. ते सातत्याने या प्रभागातून निवडून येत आहेत. गेल्यावेळी याप्रभागातून शिदसेनेकडून केवळ बोसते हेच निवडून आले होते. तर दुसरीकडे योगेश हिरे हे सलग दुमयांदा निवडणूक लढवत आहेत. दोघांचा मित्र परीवार, संपर्क यामुळे - जमेची बाजू आहे. परंतु अजय बोरस्ते यांच्या दृष्टीने ही निवडणूक अधिक चुरशीची असणार आहे.
संजय चव्हाण विरुद्ध राहुल शेलार
चव्हाण आणि गजानन शेलार यांच्यात २०१२ साली झालेल्या अटीतटीच्या लढत अजूनही स्मरणात
प्रभाग क्रमांक १३ सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे. माजी नगरसेवक संजय चव्हाण (उद्धवसेना) आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार। शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे राहुल शेलार (भाजप) यांच्यात थेट लढत होणार असल्याने या प्रभागात निवद्वणूक चुरशीची उरण्याची चिन्हे आहेत. आमदार देवयांनी फरांदे यांनी राहुल शेत्तार यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. दुसरीकडे राजकारणातील मुरब्बी असलेले संजय चव्हाण गेल्या पंचषिकमाये महापालिकेपासून दूर असले तरी त्यांनी प्रभागातील राजकीय वेध घेत उद्धवसेनेतच कायम राहणे पसंत केले. गावठाण भागावर असलेल्या दोघांच्या प्रभावानुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
शिवाजी गांगुर्डे विरुद्ध समीर कांबळे
ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांची लढत माजी सहकारी समीर कोबळे यांच्याशी.
तब्बल सहाव्यांदा निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी गांगुर्डे यांच्याशी याच प्रभागातील आता शिंदे सेनेत असलेले माजी नगरसेवक समीर कांबळे यांच्याशी लहत होत आहे. प्रभाग क्रमांक १२ मधी शिवाजी गांगुर्डे १९२२ मध्ये पराभूत झाले होते. त्यानंतर आजपर्यंत ते सातत्याने निवडून येत आहेत. मुख्यालीला काँग्रेस तर नंतर भाजपाकडून ते निवडून येत आहेत. स्थायी समितीचे माजी सभापतीपदही त्यांनी भूषविले आहेत. याच प्रभागातून ११२२ पासून २०१२ पर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांचळे निवडून येत होते. २०१७ मध्ये त्यांचे पुत्र सारीर कांबले निवडून आले, परंतु यंदा ते शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. एकेका प्रभागात एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले हे दोघेही आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
अशोक मुर्तडक विरुद्ध गुरमित बग्गा
बग्गा यांच्यासाठी आमदार विकले किती जोर नावतात यावर या लढतीचे भविष्य निश्चित
मनसेच्या सताकाळात महापौर आणि उपमहापौर पद एकाच वेळी भूषवलेले माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी उपमहापौर गुरमित बागा हे बदलत्या राजकारणाच्या पटात एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनून उभे राहिले आहेत. त्यावेळी मनसेचे असलेले मुर्तडक भाजपमध्ये जाऊनही त्यांना तिकीट न मिळाल्याने अखेरच्या क्षणी त्यांनी प्रभाग ५ मधून अपक्ष अर्ज भरला. तर गत आठवड्यातच शिंदेसेनेत प्रवेश केल्याने आता ते शिदेसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत, तर काँग्रेसमध्ये अपक्ष म्हणून मडूनही उपमहापौर पदापर्यंत पोहोचलेले गुरुमित बग्गा है देखील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. ते भाजपकडून रिंगणात आहेत.
दीपक बडगुजर विरुद्ध मुकेश शहाणे
एथी फॉर्म न मिळाल्याने या प्रभागातून शहाणे यांनी भाजपकडून बंडखोरी केली आहे
सिडकोतील प्रभाग क्रमांक २२ मधील बीग फाईट राजकीय पटांगणावरील टफ फाईट ठरत आहे. माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर अन् याच प्रभागाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यातील लहत चुरशीची होत आहे. सुधाकर बडगुजर अन् मुकेश शहाणे हे एकमेकांचे राजकीय वैरी, मात्र बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाने या दोधांमधील वाद अधिक वाढला. दीपक बडगुजर यांनी भाजपाचा एबी फार्म मिळवून ती उमेदवारी अर्जास ओढल्यानंतर मुकेश शहाणे यांनी अपक्ष निवडणूक लढावी लागत आहे. बडगुजर यांच्या पाठीशी त्यांचे वडील सुधाकर बडगुजर आहेत तर एकेकाळी गिरीश महाजन यांचे निकटतीय असलेल्या शहाणे यांची आक्रमकता आणि प्रतिष्ठेचा प्रश्न राहीला आहे.
संभाजी मोरुस्कर विरुद्ध मुदलियार
प्रारंभी भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक काट्याची लढत ठरत आहे.
नाशिकरोड़ वैधील प्रभाग २० ड मध्ये कारबाची लढत होत आहे. भाजपकडून तीनवेळा निवडून आलेले संभाजी मोरुस्कर, शिंदे सेनेचे कैलास मुदलीयार यांच्यात तुल्ययळ लढत होत आहे. मोरुस्कर यांनी आतापर्यंत महापालिकेत विविध पदे भूषविले असून, शिक्षण मंडळ सभापतिपद त्यांच्याकडे होते. तुलनेत दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. उद्धव सेनेचे हेमंत गायकवाड हे तिसरे उमेदवार तितकेच ताकदीचे आहेत. हेमंत गायकवाड यांच्या पत्नी संगीता गायकवाड या दोनवेळा नगरसेविका राहिल्या आहेत. तर कैलास मुदलीयार यांनी ऐनवेळी शिंदे सेनेत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. मोरुस्कर यांच्या ऐवजी उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने मायकवाड उद्धव सेनेत प्रवेश केला आहे.
प्रथमेश गिते विरुद्ध मिलिंद भालेराव
जातीय समीकरणे आणि महिलांची मते ही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली आत आहे.
प्रभाग क्रमांक १५ हा यंदा राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू ठरत आहे. भाजपचे मिलिंद भालेराव आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यातील थेट लढत विशेष मक्ष वेधून घेत आहे. मात्री आमकर वसंत गिते वांचे चिरंजीव आणि उद्धवसेनेचे शहराध्यक्ष प्रथमेश गिते दुसन्यांदा रिंगणात उतरले आहेत. एका बाजूला राजकीय वारस्य, तर दुसऱ्या बाजूला भाजपची संघटनात्मक ताकद, असा हा सामना पाहिला जात आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या प्रथमेश गिते यांनी शिवसेनेचे सचिन मराते यांचा पराभव केला होता. गिते पिता पुत्र उद्धवसेनेत गेल्यानंतर यंदा भालेराव कुटुंब बेट त्यांच्या विरोधात निवडणूक बचत आहे. अर्थात प्रथमेश यांच्यापेक्षा त्यांचे वडील माजी आमदार वसंत गिते यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
अजिंक्य साने विरुद्ध सतीश सोनवणे
पक्षांतर, जुने राजकीय संबंध आणि स्थानिक समीकरणे यामुळे येथील लढत चुरशीची होणार
प्रभाग ३० मध्ये भाजपचे अजिंक्य साने व राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार सतीश सोनवणे यांच्यात काट्याची लढत होणार आहे. हाने हे भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने यांचे चिरंजीव आहेत. ते यापूर्वी स्वीकृत नगरसेवक होते. सतीश सोनवणे यापूर्वी दोनवेळा भाजपकडून निवडून आले आहेत. यावेळी मात्र त्यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी करत आहे त्यामुळे या दोघांमध्ये काट्याची लढत होणार आहे. साने यांची भाजपची पार्श्वभूमी असून, त्यांचे वडील विजय साने भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि स्थायी समितीचे माजी सभापती आहेत, सतीश सोनवणे सर्व पक्षीय संबंध असून, त्यांती उमेदवारी अनपेक्षीत रित्या बदलण्यात आली.