पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:21 IST2026-01-02T14:20:10+5:302026-01-02T14:21:31+5:30
Nashik Municipal Corporation Election : पंचवटी उमेदवारी न मिळाल्याने असलेला असंतोष अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी देखील दिसून आला. दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये भाजपाकडून उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी रोष व्यक्त केला

पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
पंचवटी उमेदवारी न मिळाल्याने असलेला असंतोष अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी देखील दिसून आला. दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये भाजपाकडून उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी रोष व्यक्त केला. आम्ही पक्षासाठी सत्यावर उत्तरलो, अनेक आंदोलने केली, एका मिस्ड कॉलवर आम्ही पक्षासाठी झोकुन देत होतो. परंतु पक्षाने आयात लोकांना संधी दिली, असा रोष पत्रकार परिषदेत करण्यात आला.
प्रभाग ३ मधून उमेदवारी डावललेल्यांचा भाजप नेतृत्वावर निशाणा
भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या पंचवटीतील प्रभाग ३ मधील उज्वला बेलसरे, राहुल खोडे, डॉ. स्निग्धा खोडे, शाम पिंपरकर, संजय संघती, सचिन खोडे यांनी पक्षाच्या आजी, माजी आमदारांसह शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्यामुळेच आमची उमेदवारी डावलली गेली. निष्ठेचे फळ पक्षाने दिले नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
अनेकदा फोन केले, परंतु प्रतिसाद नाही : घुगे
माझ्यासह इतर ठिकाणी असलेल्या भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. इतरवेळी आंदोलन व मोर्चा असला तर नुसता मिद्ध कॉल पडला तरी आम्ही रस्त्यावर उतरतो. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या वरिष्ठांना एबी फॉर्म मिळावा, यासाठी आतोनात प्रयत्न केले. दहा, पंधरा फोन केल्यानंतरही त्यांनी फोन उचलले नाहीत, त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे भाजपचे सरचिटणीस अमित घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मागील २० वर्षांपासून भाजपचा एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत मनपा प्रभाग क्रमांक १- सर्वसाधारण जागेवर उमेदवारी देण्याचे पक्षाने मान्य केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माधारीसाठी फोन आला तरी माघार नाही, असे सांगून घुगे यांनी आपले इरादे स्पष्ट केले. स्थानिक आमदारांमुळे माही उमेदवारी डावलली असल्याचा आरोप घुगे यांनी केला. सरचिटणीस व सदस्यपदाचा भाजप शहराध्यक्षांकते राजीनामा पाठविला असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
पंचवटीतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारी नाकारल्याचा सर्वाधिक रोष पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारचा सर्व्हे न करता तिकीट नाकारले आहे. तरुणांना डावलत ज्यचि वय ७० आहे अशा उमेदवारांना उमेदवारी दिली. भाजपकडे सत्ता, पैसा तसेच मोठी यंत्रणा असल्याने ते निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकतात, उमेदवारी देताना आताचे देखील राजकारण केल्याचे घुगे यांच्यासह उमेदवारी डावललेल्या नाराज इच्छुकांनी सांगितले. त्यामुळे पक्षासमोर संकट ठाकले आहे.
दिव्यांग दाम्पत्यांची सिडकोत नाराजी
भाजपने निष्ठावंतावर अन्याय केल्याचा आरोप करत अनेकजण नाराजी व्यक्त करीत आहे. त्यात एका अपंग दाम्पत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पक्षाची अनेक कामे करण्यास सांगितली त्यानुसार ती केली मात्र उमेदवारी नाकारल्याने या दाम्पत्याने आक्रोश केला. प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपचे दिव्यांग आघाडीचे बाळासाहेब घुगे आणि यमुना घुगे है दाम्पत्य काम करीत आहे. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी निवडणूक निर्णय कार्यालयासमोर नाराजी व्यक्त केली.