Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:03 IST2025-12-28T15:02:40+5:302025-12-28T15:03:20+5:30
Nashik Municipal Corporation Election And Aaditya Thackeray : भाजपला सत्तेची व महाराष्ट्र गिळंकृत करण्याची भयानक भूक लागली असल्याचा हल्लाबोल उद्धवसेनेचे नेते व युता सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
नाशिकरोड - गेल्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत ६६ नगरसेवक निवडून आले असतानासुद्धा भाजपला इतर सर्वच पक्षांतील नगरसेवक घेण्याची गरज का पडली? असा प्रश्न उपस्थित करत भाजपला सत्तेची व महाराष्ट्र गिळंकृत करण्याची भयानक भूक लागली असल्याचा हल्लाबोल उद्धवसेनेचे नेते व युता सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
विहितगाव येथे उद्धवसेना व मनसे यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्रामध्ये गेल्या ११ वर्षांपासून बहुमतांनी सत्तेत असलेल्या भाजपने 'अच्छे दिन' आणले का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित करीत एकसुद्धा स्वप्न पूर्ण केल्याचे त्यांनी सांगावे, असे आव्हान दिले.
"भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच डागी लोकांना पक्षात घेऊन आपल्या भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. जात-पात, धर्म, प्रांत असे वादविवाद लावून जातिधर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपने मुद्दयाचे बोलावे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, मनसेचे उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदी उपस्थित होते.
आज नाशिकमधील देवळाली येथे पदाधिकारी संवाद मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
\— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 27, 2025
भाजपचं जंगलराज, रावणराज हटवून रामराज्य आणण्यासाठी नाशिक महानगरपालिकेवर आपल्याला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वर्चस्व राखावंच लागेल.
ह्यावेळी मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच नाशिक… pic.twitter.com/DFrhq0UJw2