दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे उमेदवार

By संजय पाठक | Published: March 30, 2024 08:21 PM2024-03-30T20:21:10+5:302024-03-30T20:22:01+5:30

नाशिक - दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांना आज उमेदवारी ...

Bhaskar Bhagre is candidate from Sharad Pawar's NCP for Dindori Lok Sabha constituency | दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे उमेदवार

दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे उमेदवार

नाशिक- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांना आज उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

या मतदार संघात भाजपच्या वतीने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार संघात  महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर आज शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भास्कर भगरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. दिंडोरी लोकसभेची जागाही महाविकास आघाडीकडून माकपने देखील लढवण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांचे नाव अधिकृतरित्या आज घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या मतदार संघात आता  महायुतीकडून डॉ भारती पवार आणि महाविकास आघाडी कडून भास्कर भगरे अशी लढत  पाहायला मिळणार आहे.

Web Title: Bhaskar Bhagre is candidate from Sharad Pawar's NCP for Dindori Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.