उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणार धावाधाव; सलग ३ दिवस सुट्ट्यांमुळे मिळणार दोनच दिवस

By गणेश हुड | Published: March 22, 2024 06:29 PM2024-03-22T18:29:47+5:302024-03-22T18:30:07+5:30

२७ मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल.

There will be a rush to fill the nomination form; 3 days in a row will get only two days due to holidays | उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणार धावाधाव; सलग ३ दिवस सुट्ट्यांमुळे मिळणार दोनच दिवस

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणार धावाधाव; सलग ३ दिवस सुट्ट्यांमुळे मिळणार दोनच दिवस

नागपूर  :  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार होणार आहे.  २० मार्चपासून उमदेवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. परंतु यामध्ये शनिवार, रविवार व सोमवारी धुलीवंदनाची सुटी असल्याने उमदेवारीसाठी दोनच दिवस मिळणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छूक उमेदवारांची धावाधाव होणार आहे. 

२७ मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर ३० मार्च उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची मुदत असणार आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्रनमुना २अ, नमुना२६(नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र), शपथेचा किंवा दृढ कथनाचा नमुना, छायाचित्रा बाबतचे शपथपत्र, स्वाक्षरीचा नमुनाआणि मतपत्रिकेतील नावाबाबत पत्र सादर करावयाचेआहे. या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून उमेदवाराची अपराधिक माहिती, उमेदवारांकडून कायद्याचे झालेले उल्लंघन, दोषसिद्ध ठरवले किंवा नाही याचा तपशील,मागील पाच वर्षांतआयकर विवरणपत्रात दर्शविलेले एकूण उत्पन्न, पॅनक्रमांक,आयकर विवरणपत्र भरल्याची स्थिती,फौजदारी खटले, खटल्याचा तपशील,आदी माहिती सादर करावयाची आहे.

राज्य व देशातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी अर्ज सादर करताना प्रस्तावक (सूचक) म्हणून एक व्यक्ती ग्राह्य धरला जाईल, तर स्वतंत्र (अपक्ष)उमेदवारास १० व्यक्ती प्रस्तावक म्हणूनआवश्यक राहतील. तेही ज्या लोकसभा मतदार संघासाठी तेअर्ज करणार आहेत त्याच मतदारसंघातील प्रस्तावक लागणार आहे.

Web Title: There will be a rush to fill the nomination form; 3 days in a row will get only two days due to holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.