प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध

By कमलेश वानखेडे | Updated: April 10, 2024 17:23 IST2024-04-10T17:22:45+5:302024-04-10T17:23:53+5:30

भुमरे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर ते खैरेंसारख्या अनुभवी नेत्यासमोर ते टिकणार नाहीत, अशी बाजू बंब यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे.

Prashant Bamb meets CM Shinde in Nagpur to oppose Sandipan Bhumre candidature | प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध

प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध

कमलेश वानखेडे, नागपूर: भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी दुपारी नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीच्या उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी भेट घेतल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीमध्ये ही जागा रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांना दिली जाण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार आ. बंब यांचा भुमरे यांच्या नावाला विरोध आहे. भुमरे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर ते खैरे सारख्या अनुभवी नेत्यासमोर टीकणार नाहीत, अशी बाजू बंब यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे.

Web Title: Prashant Bamb meets CM Shinde in Nagpur to oppose Sandipan Bhumre candidature