Nagpur Election Results 2026 : नागपूर प्रभाग २९ मध्ये भाजपचा ‘फुलहाऊस’, चारही जागांवर भाजपचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:19 IST2026-01-16T18:18:14+5:302026-01-16T18:19:41+5:30
Nagpur : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधून भाजपने क्लीन स्वीप करत चारही जागांवर विजय मिळवला आहे.

Nagpur Election Results 2026 : BJP's 'full house' in Nagpur Ward 29, BJP's resounding victory in all four seats
नागपूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधून भाजपने क्लीन स्वीप करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. या प्रभागातील अ, ब, क आणि ड गटातील चारही उमेदवार भाजपचे असून मतदारांनी भाजपवर ठाम विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
अ गटातून लीला हातीबेड (भाजप) यांनी तब्बल २४,०३५ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला.
ब गटातून योगेश मडावी (भाजप) यांनी २४,३९४ मते मिळवत विजयाची पताका फडकावली.
क गटातून ज्योती देवघरे (भाजप) यांनी २०,४७४ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर सरशी साधली.
तर ड गटातून अजय बोढारे (भाजप) यांनी १८,४७६ मते मिळवत विजय नोंदवला आहे.
या निकालामुळे प्रभाग २९ मध्ये भाजपचे वर्चस्व अधोरेखित झाले असून संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील कामगिरीचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि विकासकामे हे प्रमुख मुद्दे राहिले.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे.