Nagpur Election Results 2026 : नागपूर नेहरूनगर झोनमध्ये भाजप आघाडीवर, १६ पैकी ९ जागांवर विजय; प्रभागनिहाय कोण आले निवडून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:10 IST2026-01-16T19:10:01+5:302026-01-16T19:10:38+5:30
Nagpur : महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहरूनगर झोनमधील निकाल जाहीर झाले असून या झोनमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे.

Nagpur Election Results 2026: BJP leading in Nagpur Nehrunagar zone, winning 9 out of 16 seats; Who got elected ward-wise?
नागपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहरूनगर झोनमधील निकाल जाहीर झाले असून या झोनमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. एकूण १६ जागांपैकी भाजपने ९ जागांवर विजय, तर एमआयएमने ३, काँग्रेसने २ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने २ जागांवर यश मिळवले आहे.
प्रभागनिहाय निकाल
प्रभाग क्रमांक २६ मध्ये अ गटातील भाजपचे धर्मपाल मेश्राम यांना पराभव स्वीकारावा लागला असून काँग्रेसचे शुभम मोटघरे विजयी झाले आहेत. ब गटातून सीमा ढोमणे (भाजप), क गटातून शारदा बारई (भाजप) आणि ड गटातून बंटी कुकडे (भाजप) यांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपने क्लीन स्वीप करत चारही जागा जिंकल्या आहेत. अ गटातून प्रवीण ऊर्फ पिंटू गिर्हे, ब गटातून रजनी वानखेडे, क गटातून दिव्या धुरडे आणि ड गटातून अॅड. निलेश गायधने हे सर्व भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक २८ मध्ये संमिश्र निकाल लागला आहे. अ गटातून पिंटू झलके (भाजप), ब गटातून मंगला गवरे (उद्धवसेना), क गटातून निता ठाकरे (भाजप) तर ड गटातून किशोर कुमेरिया (उद्धवसेना) यांनी विजय मिळवला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ३० मध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून येथे एमआयएमचे तीन उमेदवार तर काँग्रेसचे संजय महाकाळकर विजयी झाले आहेत.
नेहरूनगर झोनमधील या निकालांमुळे भाजप आघाडीवर असली तरी एमआयएम आणि काँग्रेसने काही प्रभागांत लक्षणीय कामगिरी केली आहे. या निकालांचा नागपूर महापालिकेतील एकूण सत्तासमीकरणांवर महत्त्वपूर्ण परिणाम होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.