शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर राजू पारवेंच्या प्रचारासाठी गोविंदा मैदानात

By कमलेश वानखेडे | Updated: April 5, 2024 17:13 IST2024-04-05T17:11:30+5:302024-04-05T17:13:26+5:30

शिवसेनेकडे तिकीट मागितले नाही असं देखील गोविंदाने स्पष्ट केलं.

bollywood actor govinda omes to nagpur to join election campaign for ramtek candidate raju barve | शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर राजू पारवेंच्या प्रचारासाठी गोविंदा मैदानात

शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर राजू पारवेंच्या प्रचारासाठी गोविंदा मैदानात

कमलेश वानखेडे, नागपूर : शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते विरार को छोरा...गोविंदा हे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. स्वत:च्या उमेदवारी संदर्भात आपण कुणाशाही चर्चा केली नाही व तिकीट मागितलेले नाही, असे गोविंदा यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सावनेर विधानसभा मतदारसंघातील खापा, नांदागोमुख, कोदेगाव, उमरी, केळवद व सावनेर या ठिकाणी गोविंदा हे राजु पारवे यांच्यासोबत जावून शिवसेनेचा प्रचार करीत आहेत. यावेळी गोविंदा म्हणाले, विदर्भाच्या भूमिक शक्ती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रचारासाठी सुरुवात आपण रामटेकपासून करीत आहोत. शिवसेनेला राज्यभर यश मिळेल, यात शंका नाही. आज जी सुरुवात झाली आहे यामध्ये आपण कसे पुढे जाऊ यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची मला साथ आहे. माझ्यासाठी कोणीही परका नाही, सगळे माझ्या परिवारासारखे आहेत. महायुतीचा विजय होवे हीच मातेचरणी प्रार्थना करतो.

आतापर्यंत मी ज्या कोणत्याही गोष्टीचा विचार किंवा प्रण केला ते पूर्ण झाले आहे. यावेळी नक्की यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: bollywood actor govinda omes to nagpur to join election campaign for ramtek candidate raju barve