राज्यातील मोठे नेते पिछाडीवर ! काँग्रेससहित भाजपलाही बसू शकतो झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:02 IST2024-11-23T12:59:55+5:302024-11-23T13:02:04+5:30
Nagpur Vidhan Sabha Assembly Election Result 2024 winning candidates LIVE Updates: विदर्भातील नेत्यांमध्ये टफ फाईट; राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का

Big leaders in the state behind! Along with the Congress, the BJP can also suffer a blow
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालात विदर्भाचा निकाल लक्षवेधी ठरणार असं समजल्या जात होत ते राज्याची सत्ता मिळवण्यासाठी पण विदर्भातील निकालाचे वळण पाहता विद्यमान आमदार आणि नेत्यांना मतदारसंघात त्यांची सत्ता ठेवणे कठीण झालं आहे.
काटोल मतदारसंघातून उभे असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख दहाव्या फेरी अखेर पिछाडीवर आहेत. भाजपाचे चरण सिंग ठाकूर २६९९७ मतांनी पुढे आहेत त्यामुळे अनिल देशमुखांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघातून नाना पटोले यांना दहाव्या फेरीअखेरीस अविनाश ब्राह्मणकर यांनी ४७४ मतांनी मागे टाकले आहे. नऊ फेरी होईस्तोवर नाना पाटोले यांना मोठी आघाडी घेणे शक्य झाले नाही आणि दहाव्या फेरीअखेरीस ब्राह्मणकर यांनी नाना पटोलेंना मागे टाकत काँग्रेस नेत्यांना घाम सोडला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा क्षेत्रात आठव्या फेरी अखेरीस पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे सुरेश भोयर ५८३१ मताने आघाडी घेतली असून ते कायम ठेऊ शकतील का याची उत्सुकता आहे.
आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या नाना पटोलेना साकोलीमध्ये अविनाश ब्राह्मणकर तगडी टक्कर देत आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुलाला उमेदवारी देत काटोल मध्ये गढ राखण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या वाटेला यश येईल याचे संकेत दिसत नाहीयेत. तसेच भाजपचे प्रमुख नेते चंद्रशेखर बावनकुळे पिछाडीवर असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील धाकधूक आहे. राज्याचे मोठे नेते काटेच्या टक्करीला सामोरे जात आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष सध्या विदर्भातील काटोल, साकोली आणि कामठी विधानसभा मतदार संघात लागलेले आहे.