भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना

By कमलेश वानखेडे | Published: April 13, 2024 06:43 PM2024-04-13T18:43:52+5:302024-04-13T18:46:11+5:30

फडणवीस यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भागवत कराड म्हणाले, परभणी हिंगोली नांदेड या तीन लोकसभेचा क्लस्टर प्रमुख असून त्याचा अहवाल देण्यासाठी मी आलो होतो.

Bhagwat Karad and Uday Samant met Fadnavis in Nagpur | भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना

भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना

नागपूर : महायुतीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेनासा झाला आहे. गुरुवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी नागपुरात दाखल होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत संबंधित मतदारसंघांबाबत सिवस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. 

फडणवीस यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भागवत कराड म्हणाले, परभणी हिंगोली नांदेड या तीन लोकसभेचा क्लस्टर प्रमुख असून त्याचा अहवाल देण्यासाठी मी आलो होतो. लोकसभेमध्ये प्रचार यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाला लागलेली आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर असो की रासपचे महादेव जानकर, १५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी परभणी येथे सबा होणार आहे. हिंगोली च्या बैठकीत सुद्धा व्यापारांचा मेळाव्यात वातावरण चांगले असल्यासे दिसून आले. आपल्याला उमेदवारी दिल्यास पक्षाचा आदेश मान्य असेल. पण मला आगोदरच क्लस्टर प्रमुख ही जवाबदारी दिली आहे. 

मी सध्या तीन लोकसभेमध्ये काम पाहत आहे. कुठल्याही ठिकाणी एखादा पक्ष निवडणूक लढला की त्या ठिकाणी बळकटी मिळतेच. छत्रपती संभाजीनगर भाजपकडे आले तर त्या पक्षाला बळकटी येईल. शिंदे शिवसेना लढल्यास त्यांना बळकटी येईल. पण महायुती बळकट होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथ घेतील. जास्तीत जास्त महायुतीच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, मी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटलो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वर चर्चा झाली अशातला भाग नाही. विदर्भातील महायुतीच्या जागा संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली. 

मी त्यांना भेटून सिंधुदुर्गचा प्रश्न सुटणार नाही. यवतमाळ, हिंगोली, वाशिम या सगळ्या संदर्भातील आढावा मी उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला, असेही त्यांनी स्पष्ट केले. नारायण राणे हे महायुतीतले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी माझे म्हणणे मांडणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी हा मुद्दा अधिक न ताणण्याचे संकेत दिले.
 

Web Title: Bhagwat Karad and Uday Samant met Fadnavis in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.