Dharmveer: ... तरडे, तर मराठी प्रेक्षकांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं, दिग्दर्शकाची भलीमोठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:51 PM2022-05-18T20:51:22+5:302022-05-18T20:55:26+5:30

या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता.

Dharmeer: ... After all, the Marathi audience would never have forgiven you, a great post from the director Viju Mane | Dharmveer: ... तरडे, तर मराठी प्रेक्षकांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं, दिग्दर्शकाची भलीमोठी पोस्ट

Dharmveer: ... तरडे, तर मराठी प्रेक्षकांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं, दिग्दर्शकाची भलीमोठी पोस्ट

googlenewsNext

मुंबई - शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या 13 मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतेय. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत, अशी दाद स्वत: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही दिली आहे. 

या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तरडे यांनी याबद्दल खुलासा केलाय. धर्मवीर चित्रपट भव्यदिव्य असावा असा माझा विचार होता. इतक्या मोठ्या व्यक्तिच्या आयुष्यावर सिनेमा करायचा म्हणजे कास्टिंगवर खूप मेहनत घेतली पाहिजे. बऱ्याच जणांचे लूक टेस्टही घेतलं. पण धर्मवीरांच्या भूमिकासाठी प्रसाद ओकचं नाव माझ्या डोक्यातही नव्हते. खरं सांगायचं तर या भूमिकेसाठी विजू माने यांचं नाव माझ्या डोक्यात होतं. कारण ते लहान पणापासून आनंद दिघेच्या सहवासात होते. त्यांची उंची ही आनंद दिघेंएवढीच होती, असे तरडेंनी सांगितले.

प्रवीण तरडेंनी हे स्पष्टीकरण दिल्यानंतर विजू माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली. तसेच, आपण स्वत:हून ही भूमिका नाकारली. कारण, ही भूमिका आपण पेलू शकणार नाही, या भूमिकेला आपण न्याय देऊ शकणार नाही, असे म्हणत विजू मानेंनी तो प्रसंग सांगितला.  

दरम्यान, विजू मानेंच्या नकारानंतर आनंद दिघेंच्या रुपात जेव्हा प्रसादला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आणखी विचार करण्याचा प्रश्नच नव्हता, असंही तरडे यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
 

Web Title: Dharmeer: ... After all, the Marathi audience would never have forgiven you, a great post from the director Viju Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.